मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या अत्यंत महत्वाच्या अशा दोन्ही राज्यातील चित्ररथाना केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून खंत व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे.
हेही वाचा... वर्धा जिल्ह्याला गारपीट, पावसाचा तडाखा; कापूस, तूरसह संत्रा पिकांचे नुकसान
ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात दोन ट्विट केले आहे.
"प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.", असे त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तस, दुसऱ्या एका ट्विटमध्ये केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणतात की, "महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध."
-
.@PMOIndia महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध.(2/2)https://t.co/Q90raJSZW3
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">.@PMOIndia महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध.(2/2)https://t.co/Q90raJSZW3
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020.@PMOIndia महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध.(2/2)https://t.co/Q90raJSZW3
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2020
हेही वाचा... नववर्षदिनी जगात भारतात झाला सर्वाधिक बालकांचा जन्म
दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या आणि पश्चिम बंगालचा चित्ररथला प्रजासत्ताक दिनाच्या संचालनालयात नाकारणे हे गंभीर आहे. त्यातही महाराष्ट्राचा रथ नाकारणे म्हणजे हा आमच्या राज्याच्या अस्मितेचा अपमान आहे. आपल्या विचारांचा आणि महाराष्ट्राचा चित्ररथ या मागील ७० वर्षापासून जात आहे. अनेकदा त्याची प्रतिमा उंचावलेली दिसते. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारून भारतीय संघराज्याच्या मुळ गाभ्याला धक्का लावला, अशी टीकाही त्यांनी केली. एखादी गोष्ट तुमच्या विरोधात असेल तर त्यांचा रस घ्यायचा नाही हे खर तर एक प्रकारची बालिशपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.