ETV Bharat / city

Kedar Dighe Capture in CCTV : शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांचे 'ते' सीसीटीव्ही फुटेज आले समोर - सेंट रेजीस या पंचतारांकित हॉटेल

एका बलात्कार पीडित ( Rape Victim ) तरुणीने शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे ( Thane District President Kedar Dighe ) यांच्या विरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. केदार दिघे यांचे मित्र असलेले रोहित कपूर ( Accused Rohit Kapoor ) याने बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. त्याच्या मध्यस्थी करण्याकरिता केदार दिघेंनी लोअर परळ ( Lower Parel Area ) येथील हाॅटेलमध्ये बोलावून धमकी दिल्याचा तरुणीने आरोप केला आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज ( CCTV Now in Front ) पोलिसांच्या हाती आले आहेत.

Shiv Sena Thane District President Kedar Dighe
शिवसेना ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे
author img

By

Published : Aug 4, 2022, 8:58 AM IST

Updated : Aug 4, 2022, 9:51 AM IST

मुंबई : शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे ( Thane District President Kedar Dighe ) यांच्या विरोधात एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ( N M Joshi Marg Police Station ) बलात्कार पीडित ( Rape Victim ) महिलेला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार शिंदे यांचे मित्र रोहित कपूरने ( Accused Rohit Kapoor ) सेंट रेजीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कर्मचारी युवतीवर बलात्कार झाल्याची तक्रार एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात ( N M Joshi Marg Police Station ) मंगळवारी नोंदवण्यात आली होती. या हाॅटेलचे सीसीटीव्ही आता समोर ( CCTV Now in Front ) आले आहे. 1 ऑगस्ट 2022 चे हे सीसीटीव्ही आहेत. ज्यात रोहित कपूर आणि केदार दिघे दोघेही एकत्र दिसत आहे.

केदार दिघे यांचे 'ते' सीसीटीव्ही फुटेज आले समोर

रोहित कपूरने बलात्कार केल्याचा दावा : रोहीत कपूर या बड्या व्यावसायिकाने हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. तर पैसे घे आणि याची वाच्यता करू नकोस, नाहीतर तुला संपवू, अशी धमकी केदार दिघे यांनी दिल्याची तक्रारससुद्धा या पीडित युवतीने केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत दोघेही दिसत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. केदार दिघे यांचे या घटनेशी कनेक्शन समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

केदार दिघे यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहचण्याची शक्यता : केदार दिघे हे ठाणे जिल्हा तत्कालीन शिवसेना प्रमुख कै. आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आनंद दिघे साहेब गेल्यानंतर ते ठाणे आणि पालघर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेअंतर्गत असणाऱ्या युवासेनात कार्यरत होते. शिवसेनेच्या बहुतांशी कार्यक्रमात त्यांना बोलावले जात नव्हते. ठाण्यातील शिवसेनेचे काही नेते त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवत होते हे लक्षात आल्याने चार वर्षांपूर्वी त्यांनी युवासेनेचा राजीनामा दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करताच केदार दिघे राजकारणात सक्रिय झाले. ते शिवसेना भवनात वेळोवेळी दिसू लागले. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी काढलेल्या शिवसंवाद यात्रेत केदार दिघे आपल्या समर्थकांसह सहभागी झाले होते.

केदार दिघे यांना केले होते जिल्हाध्यक्ष : राज्यात सध्या शिंदे सरकार विरुद्ध उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा संघर्ष पाहायला मिळत आहे राज्यातील सत्ता संघर्षानंतर या दोन्हीही नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेने ठाण्यामध्ये आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष केल्यानंतर केदार दिघे विरुद्ध शिंदे असा संघर्ष पाहायला मिळाला होता. केदार दिघे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात विरोधात अटकपूर्व जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण : एका बलात्कार पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोअर परळमधील ( Lower Parel Area ) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित तरुणीने तक्रार करू नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तरुणीवर बलात्कार करणारा आणि तिला धमकावणारा अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणीने केली पोलिसांत तक्रार : यातील मुख्य आरोपी रोहित कपूर हा केदार दिघे यांचा मित्र असून त्याने 28 जुलैला लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धनादेश देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केला. त्यानंतर पैसे देऊन याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून सांगताच तरुणीने नकार दिला. त्यामुळे दिघे यांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी भादंवि 376, 506(2) आदी कलमांतर्गत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : Central Team Inspection in Chandrapur : पूरग्रस्त गावांच्या पाहणीकरिता केंद्रीय पथक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल; नऊ गावांची केली पाहणी

Last Updated : Aug 4, 2022, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.