ETV Bharat / city

CBSE : दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी, १३ विद्यार्थ्यांनी मिळविले ९९ टक्के गुण

author img

By

Published : May 6, 2019, 6:13 PM IST

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत देशभरातील ९७ टॉपरपैकी चेन्नई विभागात मोडणाऱ्या मुंबईतील तिघांचा समावेश आहे. यात नेरुळ येथील एपीजे स्कूलचा दीपक पांडा, ठाण्यातील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलचा धात्री मेहता आणि न्यू हॉरिझन स्कुलचा आंद्रे दास यांचा समावेश आहे.

सीबीएसई निकाल

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळविण्याचा विक्रम केला आहे. यंदाही देशभरातून वेगवेगळ्या विभागातून मुलींनीच आघाडी घेतल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे.

सीबीएसई परीक्षेत एकूण ९१.१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ४.४० टक्क्यांची वाढ झाली आहे. सीबीएसईच्या परीक्षेत देशात सिद्धांत पेंगोरिया प्रथम आला आहे. तर दिव्यांश वाधवा याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मागील काही अनेक वर्षात आघाडीवर असलेल्या चेन्नई विभागाला मागे ठेवत त्रिवेंद्रम विभागाने यावेळी बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागात ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पहिल्या ९७ टॉपरपैकी मुंबईतील तिघेजण-

गुवाहाटी विभागाचा सर्वात कमी निकाल -
सीबीएसईच्या दहावीला यंदा १७ लाख ६१ हजार ७८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६ लाख ४ हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात चेन्नई विभागाचा ९९ टक्के तर देवेंद्र विभागाचा ९९.८५ टक्के इतका निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा गुवाहाटी विभागाचा असून ७४.४९ टक्के निकाल लागला आहे. त्यानंतर दिल्लीचा समावेश आहे. दिल्ली विभागाचे ८०.९७टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर डेहराडून ८९.०४ असा निकाल लागला आहेत. पाटणा, भुवनेश्वर प्रयागराज, पंचकूला आणि अजमेर या विभागाचे निकाल हे नव्वदीपार पोहोचले आहेत.

गुण मिळविण्याचा विद्यार्थ्यांनी केला विक्रम -
परीक्षेत ४९८ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २४ आहे. तर इतर ५९ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९७ गुण मिळवण्याचा विक्रम या परीक्षेत केला आहे.

यंदा सीबीएससीच्या दहावीच्या निकालात अनेक खासगी शाळांच्या निकालात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालयांचा निकालही वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र सरकारी आणि अनुदानित शाळांच्या निकालाची घसरण झाली आहे.

असे आहेत निकाल-

  • केंद्रीय विद्यालय - ९९.४७ टक्के
  • जवाहर नेहरू विद्यालय - ९८.५७ टक्के
  • खासगी शाळा - ९४.१५ टक्के
  • अनुदानित शाळा - ७६.९६ टक्के
  • सरकारी शाळा - ७१.९१ टक्के

२ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्के गुण-

या निकालात २ लाख २५ हजार १४३ विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. तर त्यानंतर एकूण निकालाच्या १२.७८ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. तर ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही ५७ हजार २५६ इतकी आहे. तर त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी एकूण निकालाच्या ३.२५ इतके आहेत.

Intro:सीबीएसईच्या दहावीचा निकाल झाला जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

Body:सीबीएसईच्या दहावीचा निकाल झाला जाहीर,
13 विद्यार्थ्यांनी मिळवले 99 टक्के गुण, तर 90 टक्केची संख्या 2 लाखावर पोचली

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर तर या परीक्षेत एकूण 91.1 दहा टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मागील वर्षाच्या तुलनेत 4.40 टक्क्यांची वाढ झाली आहे. 13 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 499 गुण मिळवण्याचा विक्रम केला असून देशात सिद्धांत पेंगोरिया प्रथम आला असून दिव्यांश वाधवा हा दुसरा आला आहे.
मागील काही अनेक वर्षात आघाडीवर असलेल्या चेन्नई विभागाला मागे ठेवत त्रिवेंद्रम विभागाने या वेळी बाजी मारली असून 99.85 टक्के विद्यार्थी या विभागात उत्तीर्ण झाले आहेत तर याही वेळी देशभरातून मुलींनीच आघाडी घेतल्याचे चित्र या निकालात समोर आहे.

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत देशभरातील 97 टॉपरपैकी चेन्नई विभागात मोडणाऱ्या मुंबईतील तिघांचा समावेश आहे. यात नेरूळ येथील एपीजे स्कूलचा दीपक पांडा, ठाण्यातील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलचा धात्री मेहता आणि न्यू हॉरिझन स्कुलचा आंद्रे दास यांचा समावेश आहे

सीबीएसईच्या दहावीला यंदा 17 लाख 61 हजार 78 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 16 लाख 4 हजार 428 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यात चेन्नई विभागाचा 99.00 टक्के तर देवेंद्र विभागाचा 99.85 टक्के इतका निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा गोहाटी विभागाचा असून 74.49 टक्के निकाल लागला आहे. त्यानंतर दिल्लीचा समावेश आहे 80.97 टक्के दिल्लीचे दिल्ली विभागाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर डेहराडून 89.04 चार टक्के असा निकाल असून इतर पाटणा, भुवनेश्वर प्रयागराज, पंचकूला, अजमेर या विभागाचे निकाल हे नव्वदीपार पोचले आहेत.

या दहावीच्या परीक्षेत पहिल्यांदाच 13 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 499 गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे तर त्यानंतर 498 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 24 आहे. तर इतर 59 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 497 गुण मिळवण्याचा विक्रम या परीक्षेत केला आहे.

यंदा सीबीएससी च्या दहावीच्या निकालात अनेक खासगी शाळांच्या निकालाची थोडी सुधारणा झाली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय यांचा निकाल मात्र वाढल्याचे दिसून आले आहे.मात्र सरकारी आणि अनुदानित शाळांच्या निकालाची घसरण झाली आहे.

--
असे आहेत निकाल

केंद्रीय विद्यालय : 99.47 टक्के
जवाहर नेहरू विद्यालय। : 98.57 टक्के
खाजगी शाळा : 94. 15 टक्के
अनुदानित शाळा : 76.95 टक्के
सरकारी शाळा : 71.91 टक्के

---
2 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी मिळवले 90 टक्के गुण

या निकालात 2 लाख 25 हजार 143 विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. तर त्यानंतर एकूण निकालाच्या 12. 78 टक्के विद्यार्थ्यांनी 90 आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत तर 95 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची ची संख्या ही 57 हजार 256 इतके आहे.तर त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी एकूण निकालाच्या 3.25 इतके आहेत.

Conclusion:सीबीएसईच्या दहावीचा निकाल झाला जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.