ETV Bharat / city

CBI issues look-out Notice : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून लूक आऊट नोटीस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआय (CBI issues look-out Notice) कडून लूक आऊट नोटीस काढण्यात आल्याची विश्वासनीय सूत्रांची माहीती आहे. पांडे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakrey) यांच्या जवळचे मानले जातात.

CBI issues look-out Notice
सीबीआयकडून लूक आऊट नोटीस
author img

By

Published : Jul 5, 2022, 5:37 PM IST

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakrey) यांच्या जवळचे असणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआय (CBI issues look-out Notice) कडून लूक आऊट नोटीस काढण्यात असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. पांडे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणा संजय पांडे यांच्या विरोधात, सक्रिय झाल्याचे चित्र आहे. पांडे यांना दिल्ली येथील कार्यालयात चौकशीला बोलवण्यात आले. पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना भाजपच्या अनेक नेत्यांविरोधात पांडे यांनी तक्रारी दाखल केल्या असा त्यांच्यावर आरोप आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आता ईडीनंतर सीबीआयच्या रडारवर आले आहेत. निवृत्त होताच तीन दिवसांनी त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज 5 जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी त्यांना सीबीआयनेही लूक आऊट नोटीस जारी केली होती ,अशी माहिती समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असणारे संजय पांडे यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भाजप नेत्यांना त्रास दिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच भाजप नेत्यांना ते सर्वाधिक टार्गेट करत असत. त्यामुळे सेवानिवृत्त होताच संजय पांडे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर आता सीबीआयने लूक आऊट नोटीस पाठवल्याचेही वृत्त समोर आले आहे.

काय आहे प्रकरण? संजय पांडे यांनी आयआयटी कानपूरमधून कंप्यूटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर ते १९८६ बॅचचे आयपीएस ऑफिसर असून ३० जून २०२२ रोजी ते सेवानिवृत्त झाले. पांडे पोलीस सेवेत दाखल होण्याआधी त्यांची एक आयटी कंपनी होती. या कंपनीकडून विविध कंपन्यांचे ऑडिट केले जायचे. एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांच्यासंबंधी घोटाळ्यातील आरोपप्रकरणी संजय पांडे यांची ईडी कडून चौकशी होत आहे. चित्रा रामकृष्णन यांनी आनंद सुब्रमण्यम यांच्यासोबत शेअर बाजाराच्या यादीत प्रविष्ट असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला, असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. चित्रा रामकृष्णन यांनी एनएसई सर्व्हरमध्ये फेरफार करून त्याआधारे हा घोटाळा केल्याचे तपासात समोर आले आहे. हा गैरव्यवहार सुरू असताना एक आयटी क्षेत्रातील कंपनी एनएसईचे माहिती तंत्रज्ञानाच्याआधारे लेखापरीक्षण करीत होती. ही कंपनी संजय पांडे यांची असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. त्यामुळे त्यांचाही या घोटाळ्यात समावेश असल्याच्या संशयातून त्यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजाविण्यात आले. तसेच आता त्यांना सीबीआयनेही लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

हेही वाचा : Kid Death in Nashik : ट्रॅक्टरवरून पडून पाच वर्षे मुलाचा चालक पित्यासमोरच झाला मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.