मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे मृत्यूप्रकरण दिवसेंदिवस गूढ होत चालले आहे. या प्रकरणाचा मुंबईत तपास करणाऱ्या सीबीआयला महत्त्वाचे व्हॉट्सअप चॅट हाती लागले आहेत. सुशांतसिंहच्या मृत्यूदिवशी घरातील साफसपाई कर्मचारी दीपेश सावंत याचे एका अज्ञात व्यक्तीसोबत व्हाट्सअॅप चॅट झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सावंत याची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे.
अभिनेता सुशांतसिंहबरोबर अज्ञात व्यक्तीने 9 जून रोजी व्हॉट्सअॅप केले होते. त्यामध्ये फ्लिपकार्ट तुमच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. तर मी कोणाचा नंबर द्यावा, असा प्रश्न विचारला होता. त्यावर सुशांतसिंहने दीपेश सावंत हा माझ्यासोबत आहे, असे उत्तर दिले होते.
दीपेश सावंत याचे 14 जूनचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. हे व्हॉट्सअॅप चॅट सकाळी 10 वाजून 51 मिनिटांना सुरू झाले. ते संध्याकाळी 4 वाजून 19 मिनिटांपर्यंत बंद झाले. यात दीपेश सावंत याने समोरच्या अज्ञात व्यक्तीला सांगितले, की सुशांतसिंह यांनी फ्लिपकार्टबद्दल तुमच्यासोबत संपर्कात राहण्यास सांगितले आहे.
हेही वाचा-'सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी भाजप कनेक्शनची चौकशी करणार'
दीपेश याने हा मेसेज अज्ञात व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपवर 14 जून रोजी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी पाठविला होता. यानंतर दुपारी 2 वाजून 48 मिनिटांनी सुशांतसिंह याच्या मृत्यूनंतर या अज्ञात व्यक्तीने दीपेश सावंतला व्हॉट्सअॅप चॅट करून सगळे काही ठीक आहे ना ? असे विचारले. त्यावर हो किंवा नाही मध्ये उत्तर देण्यास सांगितले. तुम्हाला जर कुठली मदत हवी असेल तर मला फोन करा. मी 5 मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचेन, असे अज्ञात व्यक्तीने घरातील साफसफाई कर्मचाऱ्याला सांगितले.
हेही वाचा-सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया शाहची ईडीकडून सहा तास चौकशी
सध्या सीबीआयला हे दोन्ही व्हॉट्सअॅप चॅट मिळाले आहेत. याबाबत दीपेश सावंत याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याचबरोबर सुशांत सिंहची प्रेयसी रिया चक्रवर्ती व मित्र सिद्धांत पीठानी यांचीसुद्धा सीबीआय सतत करत आहे. दरम्यान, सुशांतसिंहच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार आहे, याचा सीबीआय तपास करत आहे.