ETV Bharat / city

Rebel corporator Sheetal Mhatre : बंडखोर माजी नगरसेविका शीतल म्हात्रेंच्या बॅनरला काळे फासणाऱ्या 2 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेच्या बंडखोर माजी नगरसेविका ( Rebel Shiv Sena former corporator ) शीतल म्हात्रे यांच्या कार्यालयवर लागलेल्या बॅनरवर काळी शाई ( Black ink on Sheetal Mhatre banner ) लावून त्यांना धमकी ( threatening ) वजा घोषणा दिल्या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरोधात गुरुवारी दिनांक 14 रोजी गुन्हा दाखल केला गेला आहे. अक्षय राऊत आणि राहुल गावंड या आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला.

Case filed against accused
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 15, 2022, 12:58 PM IST

मुंबई - बंडखोर शिवसेना माजी नगरसेविका ( Rebel Shiv Sena former corporator ) शीतल म्हात्रे ( Sheetal Mhatre ) यांच्या कार्यालयवर लागलेल्या बॅनरवर काळी शाई ( Black ink on Sheetal Mhatre banner ) लावून त्यांना धमकी ( threatening )वजा घोषणा दिल्या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरोधात गुरुवारी दिनांक 14 रोजी गुन्हा दाखल केला गेला आहे.

दोघांविरोधात गुन्हा दाखल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे ( former corporator Sheetal Mhatre ) यांच्या विरोधात काही शिवसैनिक संतप्त ( Angry Shiv Sainik )झाले होते. यानंतर मुंबईच्या कांदळपाडा परिसरातील ( Mumbai Kandalpada Area ) ​​शिवसेना शाखेजवळ लावलेल्या त्याच्या पोस्टरवर काही लोकांनी काळी शाई फासत त्याच्याविरोधात घोषणा दिल्या तसेच तुला बघुन देईन अशा धमकी वजा इशारा देण्यात आला होता. या घटनेनंतर आता एमएचबी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमएचबी कॉलोनी पोलिसांनी अक्षय राऊत आणि राहुल गावंड या आरोपींविरोधात भादंवि कलम 427, 504, 506, 34 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शिंदे गटावर जोरदार टीका - शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. आठ दिवसांपूर्वीच म्हात्रे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना वाघिण म्हणून संबोधले होते. पण अवघ्या आठ दिवसातच शीतल म्हात्रे यांनी घुमजाव केलं त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे गटाला रस्त्यावर उतरून फटके देण्याची भाषा करणाऱ्या म्हात्रे यांनी शिंदे गटातच प्रवेश केल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

शीतल म्हात्रे शिंदे गटात - शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पद मिळवले. त्यानंतर राज्यातील महानगरपालिकांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट शिंदे यांना पाठींबा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक शिंदे यांच्या गटात जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानंतर काही दिवसातच शिवसेनेच्या दहीसर पश्चिम येथील वॅार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका व शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

म्हात्रे यांच्याकडून बंडखोरांवर टीका - सात दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहीसर, बोरिवली आणि मागाठाणे मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. खासदार संजय राऊत यांनीही शीतल म्हात्रे यांची स्तुती केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांचे पती स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर नुकतीच म्हात्रे यांनी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis raj thackery meeting: अमित ठाकरेंची राजकारणात एंन्ट्री?; देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची "शिवतीर्थावर" भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.