मुंबई - शुक्रवारी रात्री 25 वर्षीय फॅशन डिझायनरने चार्टर्ड अकाउंटं विरुद्ध वाकोला पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 367 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी फुरकान खान याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी आरोपी आणि पीडित महिला सोशल मीडियावर मित्र बनले होते.
आरोपीने मागितले होते पैसे
आरोपीने महिलेकडे काही पैसे मागितले होते. मात्र तो तिला ते परत करत नव्हता. काही दिवसांनी, तिने खानकडे पैसे परत मागितले, परंतु त्याने बहाणे करुन तिचा फोन घेणे बंद केले. काही महिन्यांपूर्वी, त्याने तिला फोन केला आणि सांगितले की तिला भेटून तो पैसे परत करेल. त्यानंतर महिला एकटी असताना तो तिच्या घरी गेला होता, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिच्या घरी जाऊन त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला त्यामुळे महिलेने तक्रार दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'या'तारखेनंतर सुरू होणार दहावी अन् बारावीच्या परीक्षा - वर्षा गायकवाड