मुंबई- तौक्ते चक्री वादळात सापडलेल्या अरबी समुद्रातील टग बोट वरप्रदा दुर्घटनेत 11 क्रू मेंबरचा मृत्यू झाला होता. या संदर्भात मुंबईतील येलोगेट पोलिसांनी ग्लोरी शिपमॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचा मालक राजेंद्र साही यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही दुर्घटना घडल्यानंतर सुरुवातीला यासंदर्भात बार्जचा कॅप्टन राकेश बलवंत याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. मात्र त्याचा मृतदेह काही दिवसांनी नौदलाच्या बचावकार्य दरम्यान हाती लागल्यानंतर यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत होते. वरप्रदा या बोटीवरील कर्मचारी फ्रान्सिस के सायमन यांच्या तक्रारीवरून ग्लोरी शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचा मालक राजेंद्र साही यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात पोलिसांनी कलम 304 (2) 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान , या चक्रीवादळाच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेमध्ये अरबी समुद्रातील पी 305 बार्ज वरील 73 जणांचा मृत्यू झाला होता. तर वरप्रदा बोटीवरील 11 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तौक्चे चक्रीवादळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे डीएनए चाचणी करून ते मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले होते.
तौक्ते वादळातील टग बोट वरप्रदा दुर्घटना प्रकरणात कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल - बार्ज ३०५ प्रकरण
यासंदर्भात बार्जचा कॅप्टन राकेश बलवंत याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. मात्र त्याचा मृतदेह काही दिवसांनी नौदलाच्या बचावकार्य दरम्यान हाती लागल्यानंतर यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत होते. वरप्रदा या बोटीवरील कर्मचारी फ्रान्सिस के सायमन यांच्या तक्रारीवरून ग्लोरी शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचा मालक राजेंद्र साही यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.