ETV Bharat / city

'आरे'तच मेट्रोचे कारशेड करण्यावर पालिका आयुक्तही ठाम - मेट्रो 3

आरेमध्ये कारशेड झाल्याशिवाय मेट्रो 3 होऊ शकणार नसल्याचे यावेळी पालिका आयुक्तांनी सांगितले.

कारशेड
author img

By

Published : Sep 9, 2019, 10:28 PM IST

मुंबई - 'आरे'मध्येच मेट्रोची कारशेड बनवण्यावर पालिका आयुक्त, मेट्रो प्रशासन ठाम असल्याचे आज(सोमवार) झालेल्या चर्चेत दिसून आले. आता पर्यावरण प्रेमी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयात मेट्रो 3 चा विस्तार व वादग्रस्त आरे कारशेडबाबत चर्चा सत्र ठेवण्यात आले होते. यामध्ये मेट्रोच्या व्यवस्थपकीय संचालक अश्विनी भिडे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी हे चर्चा सत्रात उपस्थित होते.

जितके मेट्रो कारशेडला विरोध करत आहेत, त्यापेक्षा जास्त लोक पाठिंबा देतायेत. विरोध करायला फक्त ट्विटर अकाउंटच नसतो. जे लोक ट्रेनमध्ये प्रवास करतात, ज्यांना रोज त्रास सहन करावा लागतो. ते या कारशेडला कधीच विरोध करणार नाहीत, असे परदेशी यावेळी म्हणाले.

अनेक प्रवासी रोज लोकलमधून पडून मृत्युमुखी पडत आहेत. हे होऊ नये म्हणून आम्ही फक्त 2700 झाडाची तोड करतोय. लोकांचा मेट्रोला विरोध नाही, त्यांचा कारशेडला विरोध आहे, त्यांच्यामते पर्यायी जागा उपलब्ध करू द्यावी. पण, पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने आम्हाला येथेच कारशेड बनवावे लागणार आहे, असे परदेशी यांनी स्पष्ट केले. 2700 झाडे तोडली जाणार आहेत. पण, मेट्रो झाल्यानंतर प्रदूषणाची हानी आता झालीये, ती काही दिवसात भरून निघणार आहे. 6 पटीने आपण झाडे लावणार आहोत. सगळा प्लॅन याबाबत तयार आहे, असेही परदेशी यांनी सांगितले.

कोणीही पर्यावरणच्या विरोधात नाही, मेट्रो 3 पर्यावरणासाठीच आहे. यामध्ये 2.61 मेट्रिक टन प्रदूषण मेट्रोमुळे कमी होणार आहे. 2700 झाडे कापली जाणार असली तरी 25 हजार झाडे लावलेली आहेत. नव्याने झाडे लावली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

कांजूरमार्गचा पर्याय असताना आरे येथे जबरदस्तीने मेट्रोचे कारशेड कसे केले जात हे कसे चुकीचे आहे, याबाबत परदेशी यांनी सांगितले की. आरेमध्ये कारशेड झाल्याशिवाय मेट्रो 3 होऊ शकणार नाही.

Intro:मुंबई । आरे मध्येच मेट्रोची कारशेड बनविण्यावर पालिका आयुक्त, मेट्रो प्रशासन ठाम असल्याचे आज झालेल्या चर्चेत दिसून आले. आता पर्यावरण प्रेमी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयात मेट्रो 3 चा विस्तार व वादग्रस्त आरे कारशेडबाबत चर्चा सत्र ठेवण्यात आले होते. यामध्ये मेट्रोच्या व्यवस्थपकीय संचालक अश्विनी भिडे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेसी हे चर्चा सत्रात उपस्थित होते.
जितके जण विरोध मेट्रो कारशेड विरोध करत आहेत. त्यापेक्षा जास्त लोक पाठिंबा देतायेत. विरोध करायला फक्त ट्विटर अकाउंटच नसतो. जे लोक ट्रेन मध्ये प्रवास करतात. ज्यांना रोज त्रास सहन करावा लागतो. ते या कारशेडला कधीच विरोध करणार नाहीत, असे परदेशी म्हणाले.
Body:अनेक प्रवासी रोज लोकलमधून पडून मृत्युमुखी पडत आहेत. हे होऊ नये म्हणून आम्ही फक्त 2700 झाडाची तोड करतोय. लोकांचा मेट्रोला विरोध नाही आहे, त्यांचा कारशेडला विरोध आहे, त्यांच्यामते पर्यायी जागा उपलब्ध करू द्यावी. पण पर्यायी जागा उपलब्ध नासल्याने आम्हाला येथेच कारशेड बनवावे लागणार आहे, असे परदेशी यांनी स्पष्ट केले.

2700 झाड तोडली जाणार आहेत. पण मेट्रो झाल्यानंतर प्रदूषणाची हानी आता झालीये ती काही दिवसात भरून निघणार आहे. 6 पटीने आपण झाड लावणार आहोत सगळा प्लॅन याबाबत तयार आहे. असेही परदेशी यांनी सांगितले.

मेट्रो 3 कारशेडचा विषय नेमका काय आहे. त्याला पर्यावरण तज्ज्ञचा विरोध का आहे. आणि त्याच नेमकं स्पष्टीकरण काय आहे याबाबत आज चर्चा करण्यात आली.

आमच्याकडून हे स्पष्ट केलं कि कोणीही पर्यावरणच्या विरोधात नाही, मेट्रो 3 पर्यावरणासाठीच आहे. यामध्ये 2.61 मेट्रिक टन प्रदूषण मेट्रो मुळे कमी होणार आहे. 2700 झाड कापली जाणार असली तरी 25 हजार झाड लावलेली आहेत. नव्याने झाड लावली जाणार आहेत

कांजूरमार्गचा पर्याय असताना येथे जबरदस्तीने मेट्रो केलं जाताय हे कसे चुकीचे आहे, याबाबत परदेशी यांनी सांगितलं. आरे मध्ये कारशेड झाल्याशिवाय मेट्रो 3 होऊ शकणार नाही हे या कार्यक्रमत पटवून दिले, असे मेट्रोच्या व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मात्र यावेळी मेट्रो काराशेडमुळे पर्यावरणाला धोका आहे. आयुक्तांनी सांगितले की ट्रेनमधून लोकांचा पडून जीव जात आहे. मग ट्रेनच्या फेऱ्या का वाढवत नाहीत. मेट्रो तयार होण्यासाठी 5 वर्ष लागणार आहेत. मग 5 वर्ष तर मुंबईकरांना ट्रेन मध्येच फिरायचं आहे ना. प्रशासन दिशाभूल करत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते स्टॅलियन डी यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.