ETV Bharat / city

मुंबईत कॅन्सरग्रस्त रुग्णाने मदतीसाठी घराबाहेर लावले फलक - mumbai news

मालाड पश्चिम येथे राहणारे राजू उर्फ राजन कातकर त्यांना अचानक कॅन्सर आजर झाला. घरची परिस्थीती हालाकीची असल्यामुळे कातकर यांनी आपल्या घराच्या बाहेर मदत मिळण्यासाठी एक फलक लावले.

कॅन्सरग्रस्त रुग्णाची मदतीसाठी याचना
कॅन्सरग्रस्त रुग्णाची मदतीसाठी याचना
author img

By

Published : Jan 5, 2021, 5:20 PM IST

मुंबई - मालाड पश्चिम येथे राहणारे राजू उर्फ राजन कातकर यांना कॅन्सरचा आजराने ग्रासले आहे. घरची परिस्थीती हालाकीची असल्यामुळे कातकर यांनी आपल्या घराच्या बाहेर मदत मिळण्यासाठी एक फलक लावले. "मला कॅन्सर झाला आहे, उपचारासाठी तुम्हाला शक्य होईल ती आर्थिक मदत म्हणून डोनेशन बॉक्स मध्ये टाकण्यात यावी", असे आवाहन त्यांनी केले आहे.

घरची परिस्थिती देखील कठीण-

राजू कातकर हे कोरोनाच्या अगोदर दिवसा इस्टेट एजंट आणि संध्याकाळी वडापाव विकून आपल्या घराची परिस्थिती सांभाळत होते. परंतु लॉकडाऊन मध्ये प्रथम त्यांना कावीळ हा आजार झाला, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. एक ते दोन महिने त्यावर उपचार देखील घेण्यात आले. तरी देखील त्यांना बर वाटले नाही. घरची परिस्थिती देखील कठीण असल्यामुळे नातेवाईकांकडून काही आर्थिक मदत देखील घेण्यात आली. परंतु त्यांना कावीळ नंतर डॉक्टरांनी कॅन्सर आजर असल्याचे सांगितले.

अनेक ट्रस्टकडे देखील मागीतली मदत-

कॅन्सर वर उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. तरी देखील त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. त्यामुळे घराबाहेर फलक लावून ते नागरिकांना मदतीसाठी आवाहन करीत आहेत. कोरोना काळात शासकीय कार्यलय बंद होते. अनेक ट्रस्टकडे देखील मदत मागण्यात आली व आमदार नगरसेवक यांच्याकडे देखील मदत साठी प्रयत्न केले. तरी देखील त्यांना कुठून काही मदत झाली नाही. त्यामुळे त्यांनी घराबाहेर मजतीसाठी फलक लावले आहे. केमोथेरपीसाठी महिन्याला 15 ते 20 हजार रुपये लागत आहेत.

हेही वाचा- गरीबांना कोरोना लस मोफत देण्याची केंद्राकडे मागणी करणार - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.