मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थनी त्यांची भेट घेतली. त्यांची भेट झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडवीस उद्या (दि ६ ऑगस्ट) दिल्लीला जात असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कार्यक्रम दिल्लीमध्ये ठेवला आहे. त्या कार्यक्रमाला फडणवीस जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
निकम यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण - शिवसेना कोणाची या वादावर सलग दोन दिवस सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेतला. मुख्यमंत्र्यांचे 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा भेट ( Ujjwal Nikam meets cm eknath shinde )झाली. दरम्यान, शिंदे सरकार कायदेशीररित्या काहीं मुद्द्यांवर अडचणीत येणार असल्याचे वकील निकम यांनी शिंदे यांना सांगितल्याचे समजते.
...म्हणून मुख्यमंत्र्यांनी निकम यांची घेतली भेट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेवर संकट ओढवले आहे. शिवसेनेने शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करावे, अशी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बराच खळ झाला आहे. या प्रकरणावर सरन्यायाधीशांनीही शिंदे गटाच्या वकिलांना राजकीय पक्षांना महत्त्व देत नाही का, असा मुद्दा उपस्थित करत कोंडी केली आहे. तसेच शिंदे गटाच्या वकिलांना लिखित स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले होते. गुरुवारी देखील सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. सोमवारी पुन्हा यावरती सुनावणी होईल. त्याचप्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावले होते.
मंत्रिमंडळाला महूर्त मिळेना - विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यामध्ये असते. आता ऑगस्ट सुरू झाला असताना त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला ( Cabinet expansion ) मुहूर्त मिळेना, की कुठून ग्रीन सिग्नल मिळेना का? हे समजायला मार्ग नाही. मंत्रिमंडळ करायला ते घाबरतात हे समजायला मार्ग नाही, असे म्हणत पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत अशी मागणी त्यांनी केली. तात्काळ मंत्रिमंडळ स्थापन करून, अधिवेशन बोलवून मदत करण्यात यावी असे राज्यपालांना भेटून सांगितल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची 'नंदनवन'वरती मुख्यमंत्र्यांशी भेट; म्हणाले, 'कितीही युक्तीवाद केला तरी...'