ETV Bharat / city

Pravin Raut remanded in judicial custody : प्रवीण राऊत यांना 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना अटक केली होती. आज प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना 7 मार्चपर्यंत (Pravin Raut remanded in judicial custody) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

pravin raut
प्रवीण राऊत
author img

By

Published : Feb 24, 2022, 6:07 PM IST

मुंबई - मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना अटक केली होती. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. आज प्रवीण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना 7 मार्चपर्यंत (Pravin Raut remanded in judicial custody) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मागील सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयासमोर सांगितले की, प्रवीण राऊत यांनी अनेक राजकीय नेत्यांना पैसे दिले आहे. अशी बाब तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आणखी कोठडीची आवश्यकता आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने प्रवीण राऊत यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्ता जप्त

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली होती. पीएमसी बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाउंटवरून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा व्यवहार का करण्यात आला होता याचे उत्तर ईडीला हवे आहे. याचसाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते.

कोण आहेत प्रवीण राऊत?

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशीसुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्याचे 90 कोटी रुपये हडपले, असा संशय ईडीला आहे. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होता. या व्यवहारामुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.