ETV Bharat / city

चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; मुंबईत बसचा अपघात, सर्व प्रवासी सुरक्षित - mumbai best

चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क येथे बेस्ट बसला अपघात झाला. बस ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आल्याने, बसवरील ताबा सुटून बस फुटपाथावरील भाजीच्या दुकानात घुसली. बसचालकाला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bus accident
बेस्ट बसला अपघात
author img

By

Published : Oct 20, 2020, 3:24 PM IST

Updated : Oct 20, 2020, 4:43 PM IST

मुंबई - चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क येथे बेस्ट बसला अपघात झाला. बस ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील ताबा सुटून बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानात घुसली. बसचालकाला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bus accident

अपघात झालेली बस ही चेंबूरकडे जात होती. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही बस बसंत पार्क येथे आली असताना, ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला. तो जागीच स्टेअरिंगवर पडल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानात घुसली व नंतर या बस सिग्नलला धडकली. या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रवाशाला इजा झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. हरिदास पाटील असे या बसचालकाचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Last Updated : Oct 20, 2020, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.