ETV Bharat / city

Karan Johar Party Update : करणसह, अमृता अरोरा आणि करीना कपूरच्या इमारतींना केले सील - Kareena Kapoor Amrita Arora Covid Positive

चित्रपट निर्माता करण जोहर (Film Maker Karan Johar) याच्या पार्टीत सहभागी होणं अभिनेत्री करीना कपूर (Actress Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) यांना चांगलंच भोवले आहे. कोरोनाची लागण झाल्याने या दोघींसह पार्टीचे आयोजन करणाऱ्या करण जोहर यांचेही घर मुंबई महापालिकेने सील (Karan Johar Amrita Arora Kareena Kapoors Buildings Sealed By BMC) केले आहे.

अमृता अरोरा आणि करीना कपूर
अमृता अरोरा आणि करीना कपूर
author img

By

Published : Dec 14, 2021, 1:11 PM IST

Updated : Dec 14, 2021, 1:41 PM IST

मुंबई - अभिनेत्री करीना कपूर (Actress Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) या दोन अभिनेत्रींना कोरोनाची लागण (Kareena Kapoor Amrita Arora Covid Positive) झाली आहे. या दोघींना होम क्वारंटाईन केले असून, आज महापालिकेचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले. पालिकेच्या या पथकाने आज या 3 जणांच्या इमारती सील केल्या असल्याची (Karan Johar Amrita Arora Kareena Kapoors Buildings Sealed By BMC) माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

करणसह, अमृता अरोरा आणि करीना कपूरच्या इमारतींना केले सील

अभिनेत्री कोरोना पॉजिटिव्ह
मुंबईमध्ये एकीकडे कोरोनाचा प्रसार सूरु असताना ओमायक्रॉन विषाणूचेही (Omicron Variant) रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणू पासून वाचण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. त्यानंतरही अनेक लोकं याचे पालन करताना दिसत नाहीत. असाच प्रकार अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा (Kareena Kapoor Amrita Arora Covid Positive) यांच्या बाबतीत घडला आहे. करण जोहर याच्या पार्टीत सहभागी झालेल्या या दोघी अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

3 इमारती सील
शनिवारी करीना कपूर आणि अमृता अरोरा यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रविवारी त्याचा अहवाल आला असून, त्यात दोघीही पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. या दोघींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकी १५ लोकांची चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आज येणार आहे. दरम्यान, आज पालिका पथकाने करिना, अमृताच्या घरी भेट देऊन सॅनिटायझेशन केले. तसेच करण जोहर, अमृता अरोरा आणि करीना कपूर यांच्या रेसिडेन्सी, सदगुरू शरण आणि सरकार हेरिटेज या तीन इमारती मुंबई महापालिकेने (BMC) सील केल्या आहेत.

दोन्ही अभिनेत्री होम क्वारंटाईन
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर व तिची मैत्रीण अमृता अरोरा यांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काल रविवारी आला आहे. त्यात या दोन्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच पालिकेने या दोन्ही अभिनेत्रींना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच या दोघीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकी १५ लोकांची माहिती गोळा करून त्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या लोकांचे अहवाल उद्या येतील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

Last Updated : Dec 14, 2021, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.