मुंबई- मध्य रेल्वे मार्गावरील टिटवाळा रेल्वे स्थानकांदरम्यान तीन म्हशीने लोकल ट्रेनला धडक ( Railway Hits Buffalo ) दिल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली ( Traffic On Central Railway Is Disrupted ) होती. या घटनेत तीन म्हशी पैकी दोन म्हशींचा जागीच मृत्यू झालेला ( Buffalo Died In Railway Accident ) आहे. या घटनेमुळे लोकल सेवाना लेटमार्क लागलेला आहे.
अशी घडली घटना- मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी रेल्वेमार्गावर अचानक 3 म्हशी रेल्वे रुळावर आल्या होत्या. त्यामुळे यातिन्ही म्हशीला लोकल ट्रेनची जोरदार धडक बसलेली आहे. याघटनेत दोन म्हशी लोकल ट्रेन खाली आल्या. त्यांच्या जागीच मृत्यू झालेला आहे. तर एक म्हैस जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तब्बल एक तासानंतर लोकल ट्रेन खालून दोन्ही म्हशीला काढून टाकण्यात आले. 5.40 लोकल वाहतूक पूर्ववत व करण्यात आली. या घटनेमुळे आसनगावला जाणाऱ्या लोकल ट्रेनवर परिणाम झालेला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
अनेक लोकल ट्रेनला लेट मार्क- या घटनेमुळे कल्याण-कसाराकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन खोळंबल्या होत्या. ही घटना सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी घडल्यामुळे परतीच्या प्रवासाला लेटमार्क लागलेले आहे. याशिवाय कल्याण कसाराकडे जाणारी एक्सप्रेस सेवा तर उपनगरीय लोकल ट्रेनचे वेळापत्रकालाही मोठा फटका बसलेला आहे. रेल्वेमार्गावर सुरक्षा भिंती नसल्यामुळे अशा प्रकारच्या वारंवार घटना होत आहे. अनेकदा रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे रुळाशेजारी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी होती. मात्र रेल्वेकडून यावर दुर्लक्ष केल्या जात असल्याने अशा घटना आज होत आहेत.