ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : 'पिसावर कोरली बुद्ध प्रतिमा" कलाकाराकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन

author img

By

Published : May 7, 2020, 5:03 PM IST

सोशल मीडियावर आपल्या कलेच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. पक्षांच्या पिसांवर काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण करणारे निलेश चौहान यांनी अशाच पद्धतीने पिसावर गौतम बुद्ध यांची प्रतिमा रेखाटली आहे.

Artist Nilesh Chauhan
कलाकार निलेश चौहान यांनी पिसावर कोरली बुद्ध प्रतिमा

मुंबई - लॉकडाऊनमुळे नागरिकांना सण, उत्सव, जयंत्या घरातच साजऱ्या कराव्या लागत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपल्या कलेच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. पक्षांच्या पिसांवर काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण करणारे निलेश चौहान यांनी अशाच पद्धतीने पिसावर गौतम बुद्ध यांची प्रतिमा रेखाटली आहे. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्यांनी या अनोख्या पद्धतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षांचे हे पंख त्यांनी ज्यांच्याकडे पाळीव पक्षी आहेत, त्यांच्याकडून घेतले आहेत.

हेही वाचा... लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...

कागद, लाकूड आणि अन्य वस्तूवर कोरीव काम करणारे अनेक कलाकार आहेत. मात्र, पक्ष्यांच्या पंखावर कोरीव काम करणारे देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यापैकी एक निलेश एक आहेत. साऊथ अमिरेकत आढळणाऱ्या स्कार्लेट मकाऊ या पोपट जातीतील पक्षाचे पीस घेऊन निलेश यांनी गौतम बुद्ध यांची प्रतिमा साकारली आहे. निलेश यांना ही कलाकृती साकारण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला आहे.

दोन महिने टाळे बंदी असल्यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडत आहे. त्यामुळे शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांना आठवण करण्याची हीच खरी वेळ आहे. यामुळे ही कलाकृती साकारत लोकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा तसेच शांततेचा संदेश देत आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी मला दोन दिवस लागल्याचे निलेश यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.