ETV Bharat / city

Mumbai Crime News : मुलाने वडीलांचे दुकान टाकले बँकेत गहाण; पोलिसांनी केली अटक - हस्तीमल जैन यांची मुलाविरोधात तक्रार

बोरिवलीत एका मुलाने बापाची खोटी सही करुन दुकान बँकेत गहाण ठेवले ( Boy Mortgaged His Father Shop Borivali ) आहे. याप्रकरणी वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलाला अटक केली ( Borivali Police Arrested ) आहे.

प्रमोद जैन
प्रमोद जैन
author img

By

Published : Feb 23, 2022, 4:15 PM IST

मुंबई - मुंबईत बोरिवली परिसरात राहणाऱ्या एका मुलाने त्यांच्या वडीलांची बोगस सही करुन वडीलांची अडीच कोटींची फसवणूक केली ( Boy Mortgaged His Father Shop Borivali ) आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी मुलाला अटक केली ( Borivali Police Arrested ) आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 77 वर्षीय हस्तीमल जैन यांचे बोरिवली मध्ये मोक्ष प्लाजा या इमारतीत तीन दुकाने आहेत. त्यांचा मुलगा प्रमोद जैन याने वडीलांची परवानगी न घेता बोगस सही करुन दुकान बँकेत गहाण ठेवले. त्यातून त्याला अडीच कोटींची रक्कम मिळाली. ही बाब कळताच हस्तीमल जैन यांनी बोरिवली पोलीस स्थानकात तक्रार केली होती.

पोलीस निरीक्षक विजय माडेय प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

त्यातक्रारीच्या आधारे बोरिवली पोलिसांनी आरोपी मुलगा प्रमोद जैन विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रमोद जैनला न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत बोरिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - Kirit Somaiya On Nawab Malik ED : शरद पवारांनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा - किरीट सोमैया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.