मुंबई - आपले लग्न होऊ नये म्हणून काळा जादू करत असल्याच्या संशयावरून पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याची घटना वडाळा परिसरातील पंचशिलनगर आनंदवाडी येथे शनिवारी (दि. 4 जून) रात्रीच्या सुमारास घडली आहे. निर्मला विजय ठाकूर (वय 42 वर्षे ), असे मृत आईचे नाव आहे. तक्रारीनंतर 12 तासामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
वडाळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मोठा मुलगा अक्षय विजय ठाकूर ( वय 25 वर्षे) याचे कोमल दत्तात्रेय भोईलकर ( वय 22 वर्षे ) मुलीशी प्रेम आहे. हे दोघे लग्नही करणार होते. मात्र, दोघांच्या लग्नाला आईचा विरोध आहे आणि लग्न होऊ नये म्हणून आईकडून काळा जादू आणि करणे करण्यात येत असलेल्या संशयावरून मोठा मुलगा अक्षय, प्रेयसी कोमल आणि अक्षयचा लहान भाऊ यांनी मिळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनंतर वडाळा पोलिसांनी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींना 24 तासांचे आत खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. सोमवारी (दि. 6 जून) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा - Salman Khan : सलमान खान आणि त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी