मुंबई - फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात फसवून कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या महिलेला विदेशी नागरिकासह बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. बोरिवली पश्चिमेस राहणाऱ्या महिलेने 10.5 लाख रुपयांना फसविल्याची माहिती समोर आली आहे. इफिनाई मधुकसी प्रिन्स (30) आणि उत्तर भारतीय महिला हेयो बोलो मेइंग (23) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
फेसबुकवरून आर्थिक फसवणूक झाल्याची बोरिवली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 16 डेबिट कार्ड, 10 पासबुक, 2 लॅपटॉप, 9 मोबाईल, 4 नवीन सिम, आणि 2 आंतरराष्ट्रीय सिम ताब्यात घेतले आहेत.
हेही वाचा-स्मार्टफोनवर वेळ घालविण्यात भारतीय लोक जगात प्रथम
आरोपींनी टाळेबंदीदरम्यान 1.5 ते 2 कोटी रुपयापर्यंत विविध लोकांना लुटल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपी इफिनाई मधुकसी प्रिन्स (30) हा खोट्या फेसबुकच्या आधारे मुंबईतील वेगवेगळ्या तरुणींना फ्रेंडशिपची रिक्वेस्ट पाठवत होता. त्यानंतर त्या महिलेचा व्हाट्सअप नंबर घेऊन तिला लंडनवरून गिफ्ट येणार असल्याची थाप मारून पैसे घेत होते.
हेही वाचा-केंद्र सरकारचे ट्विटरबरोबर उडाले खटके; 'कू'ला मिळाला फायदा
हेयो बोलो मेइंग ही जाळ्यातील तरुणीला बोलून विमानतळावरील सुनीता शर्मा अधिकारी असल्याचे सांगत होते. त्यानंतर तरुणीकडे सीमा शुल्क भरण्यासाठी दोन ते तीन लाख रुपये मागितले जात होते. जर त्या तरुणीने पैसे देण्यास नकार दिला तर गिफ्टमध्ये तीन ते चार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. हे ऐकून त्या महिला अथवा तरुणी दोन ते तीन लाख रुपये आरोपीच्या बँक खात्यावर पैसे जमा करत होत्या, अशी माहिती बोरीवली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल कुंभार यांनी दिली.