ETV Bharat / city

Aryan Khan Drug Case : आजची रात्र कारागृहातच, कोर्टाचे कामकाज संपल्याने सुनावणी उद्यावर - आर्यन खान बातमी

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Oct 27, 2021, 3:25 PM IST

Updated : Oct 27, 2021, 10:09 PM IST

19:43 October 27

वानखेडेंची आज चौकशी केली, ठोस माहिती मिळेपर्यंत तेच तपास अधिकारी असतील - एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह

चौकशीनंतर बाहेर येताना समीर वानखेडे

मुंबई - समीर वानखेडे यांची आज चौकशी करण्यात आली. मागितलेली प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे त्यांनी सादर केली. गरज पडल्यास त्यांची आणखी चौकशी केली जाईल. जोपर्यंत त्यांच्याविरुद्ध ठोस माहिती किंवा पुरावे मिळत नाही, तोपर्यंत तेच क्रूझ ड्रग्ज  प्रकरणात तपास अधिकारी म्हणून राहतील - एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह

17:48 October 27

NCB चा दुसरा पंच शेखर कांबळे कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल

नवी मुंबई - NCBचा दुसरा पंच शेखर कांबळे कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. समीर वानखेडे आणि अनिल माने हे मला अधूनमधून फोन करत होते. समीर वानखेडेंवर बनावट कारवाईचा आरोप आहे. तसेच कारण नसताना आम्ही यात अडकलो आहोत. खारघरमधली ती कारवाई बनावट असल्याचा दावा दुसरा पंच शेखर कांबळेने केला आहे. 

17:38 October 27

आजची रात्र कारागृहातच, कोर्टाचे कामकाज संपल्याने सुनावणी उद्यावर

  • Drugs-on-cruise case | The arguments of accused number 1, 2 and 3 have concluded today. Hearing scheduled for 3pm tomorrow for further arguments: Munmun Dhamecha's lawyer Kaashif Khan Deshmukh pic.twitter.com/nab9ZxjiNM

    — ANI (@ANI) October 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - हायकोर्टाने युक्तीवाद उद्यावर ढकलला आहे. तीनही आरोपींच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला. कोर्टाचे कामकाज संपल्याने आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे, उद्या एनसीबीच्यावतीने युक्तीवाद होईल

17:27 October 27

17:25 October 27

मुनमून विरोधात पुरावे सिद्ध करण्यात एनसीबी फेल - वकील खाशिफ

मुंबई - मुनमून तरुण मुलगी आहे. तिचा कोणाशीही संबंध नाही. मुनमून विरोधात पुरावा सिद्ध करण्यात एनसीबी फेल झाली आहे, असा युक्तिवाद मुनमूनचे वकील खाशिफ यांचा युक्तिवाद

17:19 October 27

कटाचा पुरावा नाही, त्यामुळे जामीन मिळायला हवा - अमित देसाई

मुंबई - जास्तीत जास्त शिक्षा एक वर्ष कारावासाची असताना कोठडीची गरज काय आहे? जामीन दिल्यास तपास थांबवला जाणार नाही. मी अशा प्रकरणात जामीन मागत आहे जिथे शिक्षा फक्त एक वर्ष आहे. आणि जिथे कटाचा कोणताही पुरावा नाही, असा युक्तिवाद अमित देसाई यांनी केला आहे.

17:10 October 27

जामीन मंजूर करा, आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करू - अमित देसाई

मुंबई - जामीन मंजूर करा, आम्ही तपास यंत्रणांना तपासात सहकार्य करू, असे आश्वासन अमित देसाई यांनी कोर्टात दिले. तसेच देसाईंचा युक्तिवाद संपला असून, मुनमुन धमेचाचा युक्तिवाद सुरू झाला आहे.

16:55 October 27

जामीन मिळालेल्यांकडे देखील ड्रग्ज सापडले, अमित देसाई यांचा दावा

मुंबई - काल ड्रग प्रकरणातील दोघांना NDPS कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याचा संदर्भ अमित देसाई यांनी मुंबई हायकोर्टात दिला.

16:51 October 27

आम्ही जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी अटक का? - अमित देसाई

मुंबई -  आम्हाला गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे जो आम्ही केलाच नाही. तसेच आरोपींची कोणतीही वैद्यकीय चाचणी न केल्यामुळे ड्रग्ज सेवन केल्याचा आरोपही लागू करु नये, असा युक्तिवाद अमित देसाई यांनी केला.  

16:43 October 27

...तर सुनावणी उद्या ठेवेन - न्यायमूर्ती

न्यायमूर्ती सांबरे यांनी देसाईंना : तुम्ही ४५ मिनिटांत युक्तिवाद पूर्ण करू असे सांगितले होते. वेळेत पूर्ण नाही केला तर सुनावणी उद्या ठेवेन, माझ्याकडे इतर सुनावणी देखील आहेत.

16:37 October 27

अटकेवेळी वैद्यकीय चाचणी केली नाही - अमित देसाई

  • Drugs-on-cruise case: Accused Arbaz Merchant's lawyer Amit Desai tells Bombay High Court, "There was medical test to ascertain the consumption. We were arrested for an offence, under Section 27 of NDPS Act, which didn't take place."

मुंबई - आरोपी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई युक्तिवाद करताना म्हणाले की, आरोप निश्चित करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यात येत असते. मात्र, NDPS कायद्याच्या कलम 27 अंतर्गत ही अटक करण्यात आली त्यावेळी वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही.  

16:28 October 27

अनिल देसाईंकडून युक्तिवाद

अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई जामिनासाठी युक्तिवाद करताना म्हणतात की, अर्नेश कुमारचा निकाल (सर्वोच्च न्यायालयाने) 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या किरकोळ गुन्ह्यांच्या अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये एक आदेश आहे.  

16:11 October 27

अर्बाज मर्चंटच्यावतीने देसाईंचा कोर्टात युक्तिवाद सुरू

  • Drugs-on-cruise case | "The arrest was illegal. I point out a Supreme Court judgement which says arrest is an extremely strong measure & should be exercised only to prevent the accused from committing another crime or preventing him from running away from law," Desai argues

मुंबई -ड्रग प्रकरणात केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद वकील देसाई यांनी केला आहे.  

16:00 October 27

जामिनावर सुनावणी सुरू

  • Former AG Mukul Rohatgi, appearing for Aryan Khan in drugs on cruise ship case, at the Bombay High Court

    Hearing on Aryan Khan's bail application in the case to be held shortly pic.twitter.com/S9jV7npUID

मुंबई - आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.

15:57 October 27

संबंधित सर्वांची चौकशी करणार - NCB DDG

मुंबई - आर्यन खान प्रकरणातील सर्वांना बोलवण्यात येणार आहे.  वसुली प्रकरणातील सर्व लोकांची तपास करण्यात येईल. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीची चौकशी होणार असल्याची माहिती NCB चे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे. 

15:34 October 27

भाजपचे राज्यपालांना पत्र, NCB प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी

  • Mumbai BJP writes to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, seeking his intervention into the matter of "baseless allegations" being levelled by State Minister Nawab Malik against NCB & its officer Sameer Wankhede in the drugs-on-cruise case

मुंबई - भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. क्रूझ  ड्रग्ज प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि त्यांचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावलेले आरोप प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी या पत्रात केली आहे.

15:11 October 27

जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी होणार सुरू

मुंबई - आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी केली जाणार आहे. काल (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाचे कामकाज संपल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी आता आज (बुधवारी) घेतली जाणार आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच जाणार की जामीन मिळणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मनीष राजगढीया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर झाला आहे.

क्रूझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक

आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. क्रूझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असे रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले. आर्यन खानचा संबंध फार तर अरबाज मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी जोडला जाऊ शकतो. पण यातील अचित कुमार हा क्रूझवर नव्हता. त्याला घरून अटक करण्यात आली आहे. आर्यन तसेच अचित यांच्यात ऑनलाईन गेमिंग संदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चॅटिंग 12 ते 14 महिन्यांपूर्वी झाली आहे, असा दावा रोहतगी आणि आणि अमित देसाई यांनी केला.

सुनावणीपूर्वीच कोर्टात नाट्यमय घटना

मुकूल रोहतगी यांनी कोर्टात पंचनामा वाचून दाखवला. आर्यन खानवर NDPS च्या 8(c), 20b, 27 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलामांतर्गत गुन्हा सिद्ध झाला तर किमान 1 वर्षाची शिक्षा दिली जाते. कोर्टाने रोहतगी यांना आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काय संबंध आहे?, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आर्यन खानची चॅटिंग ही सगळी क्रूझ पार्टीच्या आधीची असल्याचा दावा रोहतगी यांनी केला. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीपूर्वीच कोर्टात नाट्यमय घटना घडली. या सुनावणीसाठी कोर्टात झालेली प्रचंड गर्दी पाहून न्यायमूर्ती संतापले आणि न्यायासनावरून उठून गेले.

कोर्टाचे कामकाज थांबले

शाहरुख खान याने आर्यनच्या सुटकेसाठी वकिलांची फौज उभी केली होती. आर्यनच्या जामिनावरील सुनावणीसाठी कोर्टात मंगळवारी मोठी गर्दी झाली होती. आर्यन प्रकरणाशी संबंध नसलेल्या वकिलांनीही गर्दी केली होती. ही गर्दी पाहून न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठून गेले आणि कोरोना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी कोर्टतील सबंधीत विभागाला सांगितले. न्यायमूर्तींच्या आदेशानुसार गर्दी कमी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे प्रकरण सुनावणीला नाही, त्यांना कोर्टाबाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे कोर्टाचे कामकाज थांबले. असोशिएटच्या निर्देशानुसार पोलिसांनी सगळ्यांना बाहेर काढले. सर्व पत्रकारांनाही बाहेर काढले. आर्यनच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी पत्रकारांना प्रथम प्रवेश दिला जाईल, अशी हमी कोर्टाच्या असोशिएटने दिली आहे. कोर्टाबाहेरही कोरोनाविषयक नियमांचे तीनतेरा वाजले आहेत. वकिलांनी विनाकारण गर्दी केली आहे. त्यामुळे वकील वर्ग आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.

एनडीपीएस कोर्टाकडून जामीन

क्रूझ ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. आरोपी मनीष राजगीर आणि अविन साहू या दोघांना विशेष एनडीपीएस कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले हे पहिले आरोपी आहेत. मनीष राजगीर याच्यावर 2.4 ग्रॅम गांजा बाळगल्याचा आरोप होता आणि अविन साहू याच्यावर ड्रग्सचे सेवन केल्याचा आरोप होता. क्रूझवरून या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, विनंती करूनही एनसीबीने आपल्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले नसल्याचा दावा अविन साहू याने केला होता.

Last Updated : Oct 27, 2021, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.