मुंबई: आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी कोविशील्ड व्हॅक्सिन कंपनीला दोषी ठरवणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने Bombay High Court सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Serum Institute of India आणि इतरांकडून याबाबत उत्तर मागितले आहे. या प्रकरणी 1 हजार कोटींची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स Microsoft founder Bill Gates, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार Government of Maharashtra आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया Drug Controller General of India यांनाही या प्रकरणात पक्षकार बनवले आहे.
हायकोर्टाने २६ ऑगस्टला नोटीस बजावली होती - बिल गेट्स फाऊंडेशनने SII (Serum Institute of India) या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. 26 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला Justice SV Gangapurwala, न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकेवरील सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होणार आहे.
हेही वाचा - Father Poisoned Children Chandrapur : जन्मदात्यानेच चिमुकल्यांना पाजले विष; बोर्डा गावातील घटनेने खळबळ
कोविशील्डची लस घेणे भाग पडले - याचिकाकर्त्याने न्यायालयात दावा केला की, त्यांची मुलगी स्नेहल लुणावत ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती. ती आरोग्य सेविका असल्याने तिला 28 जानेवारी 2021 रोजी नाशिक येथील महाविद्यालयात SII द्वारे तयार केलेली कोरोना विषाणूची लस कोविशील्ड घेण्यास भाग पाडले गेले. याचिकेनुसार, काही दिवसांनंतर स्नेहलला तीव्र डोकेदुखी, उलट्या झाल्या होत्या. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 1 मार्च 2021 रोजी उपचारादरम्यान स्नेहलचा मृत्यू झाल्याचा आरेप याचिकेत करण्यात आला आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव होत असल्याचे सांगितले होते. मृत्यूचे कारण कोविडच्या लस कोविशील्डचा दुष्परिणाम असल्याचा दावा करण्यात याचिकेत करण्यात आला आहे.
ही याचिका 2 ऑक्टोबर 2021 रोजीच्या लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांवरील केंद्र सरकारच्या समितीने (AEFI) सादर केलेल्या अहवालावर आधारित आहे, ज्यात कथितपणे कबूल केले की, कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांमुळे मुलचा मृत्यू झाला आहे. याचिकेत मृतांच्या नातेवाईकांनी एसआयआयकडून एक हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.