मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयातमुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) ईडीच्या (ED) वतीने युक्तिवाद करण्यात येणार होता. मात्र (Additional Solicitor General) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांची तब्येत खराब असल्याने, आज याचिकेवरील सुनावणी तहकुब करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये (Financial Misappropriation Case) अनिल देशमुख यांना ईडीने मागील वर्षी अटक केली होती. आता या याचिकेवर पुढील सुनावणी (next hearing on the bail application) 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. ( Anil Deshmukh Bail Application )
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मागील सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी न्यायलयापुढे, अनिल देशमुख यांचे वाढते वय आणि त्यांना असलेल्या आजारामुळे न्यायालयाने वैद्यकीय कारणाच्या आधारे, जामीन मंजूर करावा. अशी विनंती केली होती. मात्र ईडीच्या वकीलांकडून याला विरोध दर्शवण्यात आला होता.
देशमुखांची याचिका पीएमएलए न्यायालयाने यापूर्वीच फेटाळली आहे. पीएमएलएच्या दुहेरी अटी लागू झाल्यानंतर जामिनावर सोडण्यासाठी समाधानकारक कारणे द्यावी लागतील. त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर जामीन याचिका केली आहे. तुरुंगात कैद्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा मिळत असून, देशमुखांचाही त्यात समावेश आहे. मधुमेह, रक्तदाब हे सामान्य आजार आहेत; ज्यावर कोठेही उपचार होऊ शकतात. त्यामुळे जर आरोपींचा आजार चिंताकारक असेल तर, वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज करणे अपेक्षित असल्याचे सांगत एएसजी अनिल सिंग यांनी; जामीन अर्जाला विरोध केला.
काय आहे प्रकरण? : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.
हेही वाचा : Pimpri-Chinchwad : ...म्हणून मराठी अभिनेत्रीने स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस!