ETV Bharat / city

High court hearing on ST strike: एसटी संपावर आज मोठा निर्णय होण्याची शक्यता; आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची गर्दी - एसटी कर्मचारी संप मुंबई उच्च न्यायालय निर्णय

एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा ( Bombay High court hearing on ST strike ) संप सुरू आहे. आज विलिनीकरणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, आज न्यायालयात संपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ST strike Bombay high court hearing
एसटी कर्मचारी गर्दी आझाद मैदान मुंबई
author img

By

Published : Apr 5, 2022, 12:18 PM IST

मुंबई - एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा ( Bombay High court hearing on ST strike ) संप सुरू आहे. आज विलिनीकरणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, आज न्यायालयात संपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात राज्यभरातील एसटी कर्मचारी आज जमा झाले आहे.

हेही वाचा - SIT to probe ED: ईडी अधिकाऱ्यांवर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटीचे गठन

मैदानावर पोलीस बंदोबस्त : एसटी महामंडळ विलिनीकरणाच्या मागणीवरून सुरू असलेला संप चांगलाच चिघळला असून, मागील पाच महिने होऊनसुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल 1 हजार 600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या 82 हजार 498 कर्मचाऱ्यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत.

आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे, आज मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी आझाद मैदानावर जमा होत आहेत. आज मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच, मोठ्या प्रमाणात कामगार आझाद मैदानावर जमा झाले. या शिवाय कर्मचाऱ्यांची संख्या बघत आझाद मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

मुदत संपली आता होणार कारवाई : विलिनीकरणासहित विविध प्रलंबित 18 मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. तसेच, ते आझाद मैदानात गेले पाच महिने ठाण मांडून आहेत. संपाचा तिढा सोडवण्यासाठी परीवहन विभागाने सातत्याने प्रयत्न केले. परीवहन मंत्री अनिल परब यांनीही सतत आवाहन केले. परंतु, कर्मचारी ठाम आहेत. परिणामी ग्रामीण भागातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाने 31 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले होते. जे कर्मचारी हजर झाले नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. मात्र, ही मुदत संपल्यामुळे मोठ्याप्रमाणात कर्मचार्‍यांवर कारवाई होणार आहे.

हेही वाचा - Summons to Salman Khan : पत्रकार मारहाणप्रकरणी अंधेरी कोर्टाचे सलमानला समन्स, सलमानची हायकोर्टात धाव

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.