मुंबई : कांदिवलीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाचा ( Pramod Mahajan Sports Complex in Kandivali ) व्यावसायिक वापर होतोय, असे म्हणत दांडियाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्या नवरात्रोत्सव आयोजनाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे फाल्गुनी पाठक यांना मोठा दिलासा मिळाला ( Dandiaqueen Falguni Pathak Navratri Celebration ) आहे.
मुंबई उच्च न्यायालयाकडून या गोष्टीवर टीप्पणीदेत दिला निर्णय : २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत हा कार्यक्रम नियोजित आहे. क्रीडा संकुलाचा व्यावसायिक वापर करणे चुकीचा आहे, असे म्हणत संकुलात कार्यक्रम करण्यास मनाई करावी, अशी विनंती जनहित याचिकेत होती. मात्र, त्या भागात अन्यत्रही असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असूनही याचिकाकर्त्याने केवळ या एकाच कार्यक्रमाविरोधात जनहित याचिका केल्याने हेतूविषयी शंका येत आहे, असे नमूद करीत कोर्टाने याचिका फेटाळून लावली.
मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट विचारणा : MRTP कायद्या अंतर्गत, प्रवेश शुल्क आकारण्याची परवानगी आहे, असा राज्य सरकारचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने मान्य केला आहे. अपुऱ्या माहितीवर जनहीत याचिका, का दाखल केली? असा उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या यांना प्रश्न उपस्थित केला. यावर जनहीत याचिकेची गरज होती का? मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट विचारणा केली.