ETV Bharat / city

'माझे कुटुंब-माझी जबाबदारी'...आता सिनेकलाकार, साहित्यिक, कलावंतांचाही पुढाकार

author img

By

Published : Oct 5, 2020, 8:08 AM IST

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' ही मोहीम घराघरात पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी आरोग्य स्वयंसेवकांची पथके नेमण्यात आली आहेत.

maharashtra government policies
'माझे कुटुंब-माझी जबाबदारी'...आता सिनेकलाकार, साहित्यिक, कलावंतांचाही पुढाकार

मुंबई - कोरोनाविरोधातील लढाईमध्ये काम करत असलेल्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना मुंबईकरांनी साथ देण्यासाठी अनेक कलाकार आणि साहित्यिक पुढे आले आहेत. 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या मोहिमेला सहकार्य करण्यासाठी सिने-तारकांनी पुढाकार घेतला आहे.

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये काम करत असलेल्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना मुंबईकरांनी साथ देण्यासाठी अनेक कलाकार आणि साहित्यिक पुढे आले आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लागू केलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात आल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र त्याच वेळी कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नसल्याने नागरिकांनी दैनंदिन जीवनात नवीन बदलांचा स्वीकार करणे क्रमप्राप्त झाले आहे. विशेषत: मास्कचा वापर नियमितपणे व योग्यरीत्या करणे, हातांची स्वच्छता राखणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब अत्यावश्यक आहे. कोणत्याही स्थितीत कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी तसेच नवीन जीवनशैली अंगीकारण्याबाबत जनतेमध्ये जागृती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग या उपक्रमाअंतर्गत घराघरात पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी आरोग्य स्वयंसेवकांची पथकं नेमण्यात आली आहेत. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची माहिती घेणे, त्यांचे शारीरिक तापमान आणि प्राणवायू पातळी तपासणी करणे, आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींची माहिती देणे ही कामे या पथकांकडून करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून विविध मान्यवर, सिनेकलाकार, कलावंत तसेच लोकप्रतिनिधी यांच्या घरी पोहोचलेल्या या पथकांचे विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईमध्ये आपला पाठिंबा दर्शवत इतरांनीही सहकार्य करावे, यासाठी या मान्यवरांनी आवाहन केले आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद, अनिल कपूर, स्वप्नील जोशी, शिवाजी साटम, संजय मोने, विनय येडेकर, प्रख्यात अभिनेत्री नीना कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, वर्षा उसगावकर, साहित्यिक व प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर, जाहिरात विश्वातील प्रसिद्ध ॲडगुरू प्रल्हाद कक्कर, अभिनेता पुष्कर क्षोत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे सर्वांनी पालन करावे. मुंबईकरांचे आरोग्य सेवेमध्ये अखंड योगदान देत असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे आणि माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करावी, असे या मान्यवरांनी आवर्जून नमूद केले आहे.

आरोग्य यंत्रणेने पावसाळी आजारांशी संबंधित उपचारांसाठी देखील तयारी केली आहे. सोबत क्षयरोग निर्मूलन अभियान, पोलिओ लसीकरण मोहीम अशा इतर नियमित उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासह माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम देखील राबवली जात आहे. या सर्व प्रयत्नांची दखल घेत विविध मान्यवर आणि लोकप्रतिनिधींनी देखील यंत्रणेला प्रोत्साहन देत कौतुक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.