मुंबई - मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईत मोठी ( Bollywood Drugs connection ) कारवाई करत 1 हजार 400 कोटी रुपयांचा ड्रग्स पकडला आहे. त्यामुळे, मुंबई ही ड्रग्सच्या विळख्यात अडकली ( Bollywood actors drug connection ) की काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही काळात ड्रग्स आढळल्याचे प्रकार मुंबईतून समोर आले आहेत. याचे बॉलिवूडशी देखील कनेक्शन असल्याचे पुढे आले. सुशांत सिंह प्रकरणानंतर एनसीबी आणि मुंबई पोलिसांनी ( Drug connection ) मोठ्या प्रमाणात ड्रग्सविरोधी कारवाया केल्या. मुंबईत आता पर्यंत कोणकोणत्या कलाकारांवर ड्रग्ससंबंधी कारवाई करण्यात झाली याबाबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा - Coronavirus New Cases Today : देशात 24 तासात 20,551 कोरोना रुग्णांची नोंद; तर 1,35,364 सक्रिय रुग्ण
एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत एजाज खान, गौरव दीक्षित, अर्जुन रामपाल, रकुल प्रीत सिंग, अरमान कोहली आणि सारा अली खान यांची नावे आहेत. या सर्वांच्या घरांवर एनसीबीने छापीमारी केली होती. यामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अनेक कलाकारांना अटक देखील ( Bollywood stars Drug connection ) करण्यात आली होती. त्यापैकी काहीजण अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे.
अभिनेत्री रिया चक्रवती - अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अभिनेता दि. सुशांत सिंह राजपूत यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते आणि लवकरच लग्न देखील करणार होते, मात्र सुशांतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली आणि त्यामध्ये रिया चक्रवर्तीचे नाव समोर आले होते. रिया चक्रवर्ती आणि सुशांतमधील व्हॉट्सअॅप चाटमध्ये ड्रग असा उल्लेख देखील समोर आला होता. त्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली होती. जवळपास पाच महिन्यांनंतर रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला होता. मात्र आता रिया चक्रवती जामिनावर सुटलेली आहे.
कॉमेडियन भारती सिंह - कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना गेल्यावर्षी 22 नोव्हेंबर 2020 यांना ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली होती. एनसीबीने 21 नोव्हेंबर 2020 रोजी भारती सिंहच्या प्रॉडक्शन हाऊस आणि घरावर छापा टाकला होता. त्यात 86.5 ग्राम गांजा सापडला होता.
अरमान कोहली - यापूर्वी 2018 मध्ये अरमान कोहली याला उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आली होती. त्याच्याजवळ स्कॉच व्हिस्कीच्या 41 बॉटल आढळून आल्या होत्या. कायद्यानुसार 12 बॉटल ठेवण्यास मुभा आहे. मात्र, अरमान कोहलीने 41 बॉटल ठेवलेल्या होत्या. विशेष म्हणजे, यातील बहुतांश व्हिस्कीच्या बॉटल या परदेशी ब्रांडच्या होत्या. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा एनसीबीने सुरू केलेल्या कारवाईमध्ये तपासामधून अरमान कोहलीचे नाव समोर आल्यानंतर छापेमारी केली असता ड्रग्स सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अरमान कोहली कोठडीत आहे. सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन सुद्धा फेटाळलेला आहे.
फरदीन खान - 2001 साली ड्रग्ज प्रकरणात फरदीनचे नाव समोर आले होते. त्यावेळी त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे पोलिसांनी त्याला सोडून दिले. परंतु, तीन वर्षानंतर पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणात तो अडकला. यावेळी एका ड्रग्ज रॅकेटद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. या तपासणीत तो अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर फरदीनला काही महिन्यांची शिक्षा देखील झाली होती. परंतु, या सर्व प्रकरणामुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. त्याचा चाहता वर्ग दिवसेंदिवस कमी होऊ लागला. निर्मात्यांनी देखील त्याला काम देण्यास नकार दिला. आपले फिल्मी करिअर डोळ्यांसमोर ढासळतंय आणि आपण काहीच करू शकत नाही हे पाहून फरदीन नैराश्येत गेला. यामुळे त्याचे वजन देखील वाढले. परिणामी एकाएकी तो बॉलिवूडमधून गायब झाला.
सिद्धांत कपूर - बंगळुरूमध्ये रविवारी अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शन चर्चेत आले. विशेष म्हणजे, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात श्रद्धा कपूरची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. सिद्धांत कपूर देखील अभिनय जगताशी निगडीत आहे. शूटआऊट अॅट वडाळा या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात अनिल कपूर, कंगना रणौत आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. यानंतर तो अनुराग कश्यप दिग्दर्शित अग्ली या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात दिसला. सिद्धांतने त्याची बहीण श्रद्धा कपूरसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. दोघेही 'हसीना पारकर' चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात श्रद्धाने दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारली होती, तर सिद्धांत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या भूमिकेत दिसला होता. सिद्धांत 'चेहरे' चित्रपटातही होता. याशिवाय त्याने 'भौकाल' नावाच्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
हेही वाचा - BMC Wards : शिंदे सरकारने प्रभाग संख्या बदलल्याचा मुंबई पालिकेला 'असा' बसला आर्थिक फटका