मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये असल्याची माहिती आहे. आईची तब्यत बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर अक्षयकुमार लंडनहून मुंबईला परतला आहे.
अक्षयकुमार रंजित तिवारीचा सिनेमा 'सिंड्रेला'च्या शूटिंगसाठी लंडनला गेलेला होता. मात्र आईच्या तब्यतीच्या काळजीने तो सोमवारी मुंबईत परतला आहे. आईची तब्येत बिघडल्याची बातमी समजताच अक्षय कुमार लंडनवरुन आपलं शुटींग सोडून मुंबईत दाखल झाला आहे.
अक्षय कुमारच्या आईला मुंबईतील हिरानंदनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांच्याव नेमके कोणते उपचार सुरु आहेत ही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. शुक्रवारी संध्याकाळी अरुणा भाटिया यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अक्षय कुमार सोमवारी सकाळीच मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय.
अक्षय कुमार 'सिंड्रेला' या आपल्या आगामी सिनेमासाठी लंडनमध्ये शुटींग करत होता. परंतू सध्याच्या शुटींगमध्ये अक्षय कुमारची गरज नसल्यामुळे अक्षयने आपल्या आईसोबत राहण्यासाठी तत्काळ मुंबई गाठल्याची माहिती आहे.