ETV Bharat / city

राजस्थानातील बनावट आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक - Mumbai Police Anti-Ransom Squad News

सुरतमधील एका कापड व्यापाऱ्याच्या डीआरआयमध्ये एका प्रकरणात 'सेटलमेंट' करून देतो, म्हणून सुंदर शर्मा याने या व्यावसायिकाला संपर्क साधला होता. 28 सप्टेंबर रोजी सुंदर शर्मा हा या व्यावसायिकाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेटला. त्याने 25 लाख रुपयांची मागणी केली होती. ज्यावर या दोघात भांडण झाल्यावर सुंदर शर्मा याने त्याच्या जवळच्या पिस्तूलाचा धाक दाखवून या व्यावसायिकाला गुजरातमध्ये नेऊन त्याच्याकडून 16 लाख रुपये, 2 आयफोन आणि 2 आय वॉच जबरदस्तीने घेतले.

राजस्थानातील बनावट आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक

author img

By

Published : Oct 10, 2020, 12:37 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एका बनावट आयपीएस अधिकाऱ्याला खंडणी व अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राजस्थानातील सुंदर शर्मा या आरोपीला (वय 38) अटक करण्यात आली आहे.

सुरतमधील एका कापड व्यापाऱ्याच्या डीआरआयमध्ये एका प्रकरणात 'सेटलमेंट' करून देतो, म्हणून सुंदर शर्मा याने या व्यावसायिकाला संपर्क साधला होता. 28 सप्टेंबर रोजी सुंदर शर्मा हा या व्यावसायिकाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेटला. त्याने 25 लाख रुपयांची मागणी केली होती. ज्यावर या दोघात भांडण झाल्यावर सुंदर शर्मा याने त्याच्या जवळच्या पिस्तूलाचा धाक दाखवून या व्यावसायिकाला गुजरातमध्ये नेऊन त्याच्याकडून 16 लाख रुपये, 2 आयफोन आणि 2 आय वॉच जबरदस्तीने घेतले.

1000 किलोमीटरपर्यंत केला आरोपीचा पाठलाग

संबंधित व्यावसायिकाने गुजरात पोलिसांकडे याबद्दल तक्रार केल्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. यानंतर खंडणीविरोधी पथकाकडून याचा तपास केला जात होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी गुजरातमध्ये असल्याचे समोर आल्यानंतर यासंदर्भात एक पथक गुजरातला आरोपीला अटक करण्यासाठी पोहचले. मात्र, तोपर्यंत आरोपीला याची चाहूल लागल्याने तो तिथून पसार झाला. मात्र, खंडणी विरोधी पथकाने त्याचा पाठलाग 1000 किलोमीटरपर्यंत करून त्याला हुबळी (कर्नाटक) येथून अटक केली. अटक झालेला आरोपीवर याअगोदरही अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून तो स्वतःला आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून खंडणी उकळत असे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.