ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 गणेशोत्सव आधी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई पालिकेची विशेष मोहीम - खड्डे बुजवण्यासाठी मुंबई पालिकेची विशेष मोहीम

गणेशोत्सव तीन दिवसांवर आला असताना Ganeshotsav 2022 आजही मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे Mumbai Ganeshotsav 2022 पार पडाव्यात यासाठी रस्त्यावरील खड्डे वेगाने भरून रस्ते सुरळीत करा असे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी निर्देश दिले आहेत.

bmc
खड्ड्यांची पाहणी करताना
author img

By

Published : Aug 27, 2022, 9:31 PM IST

मुंबई - गणेशोत्सव तीन दिवसांवर आला असताना Ganeshotsav 2022 आजही मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे Mumbai Ganeshotsav 2022 पार पडाव्यात यासाठी रस्त्यावरील खड्डे वेगाने भरून रस्ते सुरळीत करा असे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे गणेशोत्सव सुरु होण्याआधी गणपती आगमन न विसर्जन मार्गावरील खड्डे भरण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवारी त्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. तसेच गणेशोत्सव कालावधीत रस्ते परिरक्षणाच्या दृष्टीने सर्व संबंधित रस्ते अभियंत्यांना आणि कंत्राटदारांनाही त्यांनी निर्देश दिले.

खड्डे बुजवण्यासाठी विशेष मोहीम - मुंबई महानगरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील गणेशोत्सव समन्वय समिती, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी पार पडली होती. जोरदार पावसामुळे तसेच वेगवेगळ्या प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे लवकरात लवकर भरावे आणि गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडाव्यात, यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी अशी विनंती गणेश मंडळांकडून करण्यात आली होती. प्रतिवर्षाप्रमाणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक सुरळीत राखण्यासाठी खड्डे भरण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीचा वापर - खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग देण्यासाठी यंदा रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीचा वापर करून खड्डे भरण्यात येतील, त्यामुळे खड्डा भरल्यानंतर अवघ्या सहा तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येईल, असे प्रशासनाने आश्वस्त केले होते. त्यानुसार मुंबई शहर विभागात ६९६ चौरस मीटर, पूर्व उपनगरांमध्ये ५६० चौरस मीटर आणि पश्चिम उपनगरांमध्ये ९५७ चौरस मीटर असे आतापर्यंत एकून २,२१३ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचे खड्डे रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त प्रचलित पद्धतीनुसार देखील खड्डे भरले जात आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुका सुरळीतपणे पार पडू शकतील असे पालिकेने म्हटले आहे.

अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी - प्रत्यक्ष क्षेत्रीय आढावा घेण्यासाठी अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आर-उत्तर, पी-उत्तर, पी-दक्षिण, के-पश्चिम, आणि एच-पूर्व विभागांमध्ये रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी रस्ते विभागाच्या अधिका-य़ांसोबत पाहणी केली. संपूर्ण गणेशोत्सव कालावधी दरम्यान रस्ते खड्डेमुक्त राहावेत, यासाठी रस्ते अभियंत्यांना आवश्यक ते निर्देश देखील वेलरासू यांनी दिले आहेत. तसेच मिलन सबवे येथे पावसाचे साचणारे पाणी उपसून साठवण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या जलाशयाची पाहणीही त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.