ETV Bharat / city

नालेसफाईवर मुंबई महापालिका करणार १३२ कोटींचा खर्च - मुंबईची तुंबई

पालिकेने यंदा मिठी नदीसह प्रत्येक परीक्षेत्रानुसार नाले सफाई करण्यासाठी निवीदा मागवल्या होत्या. यात, फक्त शहर विभागातील एफ उत्तर,जी दक्षिण आणि जी उत्तर या प्रभागांसाठी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा तीन टक्के दराने कंत्राट देण्यात येणार आहे.

नालेसफाईवर मुंबई महापालिका करणार १३२ कोटींचा खर्च

author img

By

Published : Feb 8, 2021, 4:11 AM IST

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. यंदा कोरोनाच्या कालावधीत कामगार मिळत नसताना पालिकेने नालेसफाईचा दावा केला. मात्र पावसाळ्यात वारंवार मुंबईची तुंबई झाली. या पार्श्वभूमीवर पुन्हा पालिका पुढील दोन वर्षांसाठी मिठी नदीसह मोठ्या नाल्याच्या सफाईसाठी १३२ कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे अंदाजित खर्चापेक्षा कमी दराने नालेसफाईचे काम करण्यास कंत्राटदारांनी सहमती दर्शवली आहे. यामुळे ही नालेसफाई की पालिकेच्या तिजोरीची सफाई असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कामाच्या दर्जाबाबत साशंकता -

महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामावर नेहमीच प्रश्‍न उपस्थित केला जातो. पालिकेने यंदा मिठी नदीसह प्रत्येक परीक्षेत्रानुसार नाले सफाई करण्यासाठी निवीदा मागवल्या होत्या. यात, फक्त शहर विभागातील एफ उत्तर,जी दक्षिण आणि जी उत्तर या प्रभागांसाठी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा तीन टक्के दराने कंत्राट देण्यात येणार आहे. तर,इतर ठिकाणी पालिकेने अंदाजित केलेल्या दरा पेक्षा १३ ते २९ टक्के कमी दराने कंत्राट देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे पालिकेने या कामाचा दर २०१८ च्या किंमतीनुसार ठरवला होता. संपूर्ण मुंबईतील नालेसफाईसाठी १३२ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. पालिकेने गाळाच्या मेट्रीक टनाच्या हिशोबाने ही किंमत ठरवली आहे. मात्र,सर्वच वस्तुंच्या किंमती वाढलेल्या आहे. त्यातच गाळ मुंबई बाहेर टाकायचा आहे. त्याचा वाहतुकीचा खर्च आहे. गाळ साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिन्ससाठी इंधनाचा वापर होतो. इंधनाचे दर रोजच्या रोज वाढत असतानाही कंत्राटदारानी २०१८ च्या किंमती पेक्षा कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

मिठीच्या सफाईसाठी ६२ कोटी -

मिठी नदीची सफाई दोन टप्प्यात होणार आहे. यासाठी पालिका ६२ कोटी ४२ लाख रुपये खर्च करणार आहे. यात कुर्ला टिचर्स कॉलनी ते वांद्रे कुर्ला संकुला पर्यंतच्या नालेसफाईसाठी ३२ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे कामही कंत्राटदार २०.७९ टक्के कमी किंमतीत करणार आहे. तर, पवई फिल्टरपाडा ते टिचर्स कॉलनीपर्यंतच्या मिठी नदीच्या सफाईसाठी २९ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे कामही अंदाजीत दरा पेक्षा २०.१० टक्के कमी दराने होणार आहे.

सफाई वेळेत होणार का -

महानगर पालिकेने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडले आहे.त्यामुळे स्थायी समितीची परवानगी मिळाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होण्यासाठी फेब्रुवारी महिन्याचा दुसरा पंधरावडा उजाडणार आहे. त्यामुळे मे अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार का असा प्रश्‍नही उपस्थीत होत आहे.

प्रभाग व नालेसफाईचा कोटींचा खर्च

  • एफ उत्तर , जी दक्षिण,जी उत्तर-
    -१२,६९,४६,२९६
  • एल,एम पूर्व , एम पश्चिम
    १३,८३,११,३७६
  • एन,एस,टी --
    ९,९१,१४,४१९
  • एच पूर्व एच पश्चिम के पूर्व
    १०,२९,६७,०३३
  • के पश्चिम,पी दक्षिण पी उत्तर
    १०,७६,६४,४४५
  • आर दक्षिण , आर मध्य , आर उत्तर
    ९,४८,७२,१०२

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.