ETV Bharat / city

Mumbai Omicron Cases : मुंबईत 'ओमायक्रॉन'चे 99 टक्के; तर एक कापा, एक XE व्हेरियंटचा रुग्ण - मुंबई ओमायक्रॉन रुग्ण टक्केवारी

मुंबई महापालिकेकडून कोविड विषाणूचा निष्कर्ष काढण्यात ( Bmc Release Statement ) येतो. त्यानुसार मुंबईतील 230 नमुन्यांमध्ये 228 अर्थात 99.13 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे आढळून आले ( 99.13 Percent Patient Omicron In Mumbai ) आहे.

Omicron
Omicron
author img

By

Published : Apr 6, 2022, 5:33 PM IST

Updated : Apr 6, 2022, 5:40 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेकडून ( Brihanmumbai Municipal Corporation ) कोविड विषाणूचा ( Corona Virus ) प्रसार किती झाला आहे. याची माहिती मिळवण्यासाठी नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या केल्या जात आहेत. यानुसार अकराव्या फेरीच्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले ( Bmc Release Statement ) आहेत. त्यानुसार एकूण २३० नमुन्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’ चे २२८ अर्थात ९९.१३ टक्के रुग्ण आढळले ( 99.13 Percent Patient Omicron In Mumbai ) आहेत. उरलेल्या दोन बाधितांपैकी एक जण ‘कापा’ व्हेरियंटचा तर, अन्य एक जण ‘एक्सई’ व्हेरियंटचा आढळून आले आहेत. रुग्णालयात दाखल २१ पैकी कोणालाही ऑक्सिजन पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही, असे या चाचण्यांमधून समोर आले आहे.

२३० रुग्णांचा अहवाल - कोविड १९ विषाणूच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग करणाऱया चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार नियमितपणे केल्या जात आहेत. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अकराव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २३० रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. या अंतर्गत अकराव्या फेरीमध्ये मुंबईतील २३० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून, त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

लस न घेतलेले १२ जण रुग्णालयात - चाचण्या करण्यात आलेल्या २३० रुग्णांपैकी ० ते २० वर्षे वयोगटातील ३१ रुग्ण (१३ टक्के), २१ ते ४० वर्षे वयोगटातील ९५ रुग्ण (४१ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटातील ७२ रूग्ण (३१ टक्के), ६१ ते ८० वयोगटातील २९ रुग्ण (१३ टक्के), ८१ ते १०० वयोगटातील ३ रुग्ण (१ टक्के) आढळून आले आहेत. २३० पैकी २१ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी फक्त ९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लसीचा एकही डोस न घेतलेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल एकूण २१ रुग्णांपैकी कोणालाही ऑक्सिजनची किंवा आयसीयूमध्ये उपचारांची गरज भासली नाही.

एकाचा मृत्यू - एकूण २३० संकलित नमुन्यांपैकी फक्त एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. मात्र, सदर मृत रुग्णाचा पोटाशी संबंधित विकारामुळे मृत्यू झाला असल्याने त्याची कोविड-इतर मृत्यू (Covid Other death) अशी नोंद करण्यात आली आहे. मृत रुग्णाचे वय वर्ष ४७ इतके होते. सदर मृत रुग्णाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

कोविड नियमांचे पालन करा - कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात येऊन जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. असे असले तरी जगातील अनेक भागांमध्ये कोविड संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन स्वयंस्फूर्तीने कायम ठेवले पाहिजे. मास्कचा स्वेच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन केले पाहिजे. कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर प्रत्येकाने वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे. सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील गरजेचे आहे, असे पालिकेने म्हटले आहे.

२३० बाधित रुग्णांचे वर्गीकरण -

• ओमायक्रॉन – २२८ रुग्ण (९९.१३ टक्के)

• कापा व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)

• एक्सई व्हेरिअंट – १ रुग्ण (०.४३ टक्के)

हेही वाचा - Sharad Pawar Press Conference : शरद पवारांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचं कारण, म्हणाले...

Last Updated : Apr 6, 2022, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.