ETV Bharat / city

BMC Officer Arrested For Taking Bribe : तीन लाखांची लाच घेताना पालिका अधिकाऱ्याला अटक

author img

By

Published : Apr 5, 2022, 3:34 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) के पूर्व कार्यालयात असलेल्या भाडे संकलक व त्यांच्या सहकाऱ्याने एका व्यक्तीची दुकाने पालिकेकडे एनेक्चर -२ नोंद करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली. ही लाच घेताना पालिकेच्या भाडे संकलक व त्याच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ( Anti Corruption Bureau ) अटक केली आहे. पालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यातच आता पालिका अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने पालिका प्रशासनाची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे.

Acb
Acb

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) के पूर्व कार्यालयात असलेल्या भाडे संकलक व त्यांच्या सहकाऱ्याने एका व्यक्तीची दुकाने पालिकेकडे एनेक्चर -२ नोंद करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली. ही लाच घेताना पालिकेच्या भाडे संकलक व त्याच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti Corruption Bureau ) रंगेहात अटक केली आहे. पालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यातच आता पालिका अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने पालिका प्रशासनाची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे.

पालिकेच्या एनेक्चर - २ मधून नाव गायब - एका व्यक्तीच्या राहत्या घरास लागुनच पुढील बाजुस त्याचे दुकान आहे. त्याचे घर त्यांच्या पत्नीच्या नावे असून दुकान हे त्याच्या नावे आहे. हे दुकान हे सन १९८५ मध्ये एसआरएमधून रितसर फी भरून तक्रारदाराने स्वतःच्या नावे व्यावसायिक ( Commercial ) करून घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी सन २०२० मध्ये मुंबई महानगनपालिकामधून एनेक्चर-२ काढले, त्यामध्ये तक्रारदार यांना त्यांच्या दुकानाची नोंद दिसून आली नाही. तसेच तक्रारदाराच्या पत्नीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या सागबाग स्नेहनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे परि -२ मध्ये नाव समाविष्ट करणेसाठी प्रकल्प अधिकारी (वसाहत) के पूर्व, बीएमसी यांचे कार्यालयात अर्ज केला होता. सदर अर्जाच्या सुनावणीअंती तक्रारदारांच्या पत्नीचे अपील हे अमान्य करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी दुकाना संदर्भात एसआरए योजनेत व्यवसायीक दुकानाची नोंद पूर्ववत करण्यासाठी दुकानाची कागदपत्रे जोडून दिनांक ६ जानेवारी, २०२२ रोजी अंधेरी के पूर्व विभाग, बीएमसी येथे अर्ज केला होता.

लाच घेताना रंगेहात अटक - राजेंद्र नाईक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या घरासंदर्भातील अपीलाबाबत ऑर्डर बदलून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद कमर्शियल म्हणून पूर्ववत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई येथे १८ फेब्रुवारी, २०२२ रोजी लेखी तकार दिली. २१ फेब्रुवारी, २०२२ रोजी केलेल्या पडताळणीत राजेंद्र नाईक यांनी तक्रारदार यांना पत्नीच्या घरासंदर्भातील ऑर्डर बदलून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद पूर्ववत करण्यासाठी तक्रारदाराकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने ४ एप्रिल, २०२२ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान नाईक व त्यांचे सहकारी मोहन रावजी या दोघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. नाईक व रावजी यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान नाईक यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता, लाचेच्या रक्कमेव्यतिरिक्त आणखी ३ लाख रुपये रोख रक्कम मिळून आलेली असून सदर रक्कम पुढील तपासासाठी जप्त करण्यात आली असल्याची माहिती लाच लुचपत विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - हृदयाचा ठोका चुकवणारा Video; रेल्वे फाटक तोडून टेम्पो सरळ रेल्वे रुळावर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.