ETV Bharat / city

BMC notice to Navneet rana : बेकायदेशीर बांधकाम तोडा अन्यथा आम्ही तोडू.. राणा दाम्पत्याला पालिकेचा 15 दिवसांचा अल्टिमेटम

राणा यांच्या घरात अनधिकृत बांधकाम आहे यावर पालिका ( BMC notice to Navneet Rana and Ravi Rana ) ठाम असून, पुढील 15 दिवसांत बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू, अशी नोटीस पालिकेने राणा ( Navneet Rana house news Mumbai ) दाम्पत्यांना दिली आहे.

BMC notice to navneet rana and ravi rana
अनधिकृत बांधकाम नवनीत राणा घर
author img

By

Published : May 21, 2022, 12:51 PM IST

मुंबई - राणा यांच्या घरात अनधिकृत बांधकाम आहे यावर पालिका ( BMC notice to Navneet Rana and Ravi Rana ) ठाम असून, पुढील 15 दिवसांत बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू, अशी नोटीस पालिकेने राणा ( Navneet Rana house news Mumbai ) दाम्पत्यांना दिली आहे. मात्र, राणा यांनी घराबाबत दिलेले सर्व पुरावे पालिकेला अमान्य आहेत. राणा यांच्या घरात अनधिकृत बांधकाम आहे यावर पालिका ठाम असून, पुढील 15 दिवसांत बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू, अशी नोटीस पालिकेने ( Unauthorized construction notice to Navneet Rana ) राणा दाम्पत्यांना दिली आहे.

हेही वाचा - Sonu Nigam : सोनू निगमचा पुन्हा एकदा चर्चेत, जुना 'तो' व्हिडिओ पुन्हा होतोय व्हायरल

पालिकेची नोटीस - खार पश्चिम, १४ व्या रस्त्यावर 'लाव्ही' इमारतीत राणा दाम्पत्याचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आले तेव्हा याच इमारतीत राहाले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे. राणा हे तुरुंगात असल्याने पालिकेच्या पथकाने त्यांच्य्या घरावर नोटीस बजावली होती. राणा यांच्या घरी पालिकेचे पथक दोन वेळा जाऊन आले. मात्र, ते तुरुंगात असल्याने पालिकेच्या पथकाला त्यांच्या घरात जाता आले नव्हते.

नव्याने नोटीस - ९ मे ला राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना होण्याच्या आधी पालिकेचे पथक त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी घरात झालेल्या बांधकामाची माहिती घेतली. त्यात काही बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे राणा दाम्पत्याला पालिकेने नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचे राणा यांनी पालिकेला कळविले आहे. राणा यांच्या उत्तराने पालिकेचे समाधान झाले नसल्याने नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू, अशी नोटीस पालिकेने राणा दाम्पत्याला दिली आहे.

हनुमान चालीसा प्रकरण - मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' या बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असे आवाहन राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबईत दोन दिवस वातावरण तापले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून ते बारा दिवस तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. जमीन मिळाल्यावर राणा दाम्पत्याने मीडियाशी संवाद साधला. विशेष म्हणजे, न्यायालयाने त्यांना मीडियाशी बोलू नये, अशी अट घातली होती. कोर्टाने दिलेली अट पाळली नसल्याने राज्य सरकारने राणा दाम्पत्याचा जमीन रद्द करण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे. त्यानंतर राणा यांना नोटीस पाठवून त्यांचे यावर म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - Sanjay Raut name for Rajya Sabha : संजय राऊत मारणार राज्यसभेवर जाण्याचा चौकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.