ETV Bharat / city

कानडी शाळांना महापालिका, राज्य शासनाचे अनुदान बंद करा - मुंबई महापौर - Shivsena protest against karnataka

कानडी लोकांच्या इथे नाड्या आवळल्या तरच कर्नाटकच्या सरकारला कळेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात हटाव लुंगी बजाव पुंगी आंदोलन करण्यात आलं होतं, त्याप्रमाणे पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत, असेही त्या पेडणेकर म्हणाल्या

Shivsena protest against karnatak
Shivsena protest against karnatak
author img

By

Published : Aug 9, 2020, 3:03 PM IST

मुंबई - मुंबईतील कानडी शाळांना देण्यात येणार अनुदान राज्य शासनाने आणि महापालिकेने बंद करावे, या मागणीसाठी शिवसेना नगरसेवकांनी विभागप्रमुख व महापौर यांच्या नावे पत्र लिहावे, असं जाहीर विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. आज लालबाग येथे नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले, त्यावेळी महापौर बोलत होत्या.

कानडी लोकांच्या इथे नाड्या आवळल्या तरच कर्नाटकच्या सरकारला कळेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात हटाव लुंगी बजाव पुंगी आंदोलन करण्यात आलं होतं, त्याप्रमाणे पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत, असेही त्या पेडणेकर म्हणाल्या.

ज्या लोकांनी या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच नाव घेऊन इथे सर्व मिळवले, मात्र त्यानंतर महाराजांच्या बाबत त्यांची द्वेषाची भूमिका असेल तर तमाम हिंदुस्थानी गप्प बसणार नाहीत. अशा लोकांच्या मड्यावर भगवा झेंडा घेऊ उभे राहू आणि शिवाजी महाराजांच्या न्यायासाठी, आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करू, असा इशाराही महापौरांनी कानडी सरकारला दिला. महाराष्ट्रात संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले आहेत हे विसरू नका, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशा घोषणा देत कर्नाटक सरकारचं प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.