ETV Bharat / city

बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर, महापालिकेच्या उद्यान विभागाची किमया - chikuwadi garden in boriwali

चिकूवाडीतील ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया महापालिकेच्या उद्यान विभागाने करुन दाखवल्याने या परिसराचे रुप पालटले आहे. कधीकाळी निर्मनुष्य भासणारा हा परिसर आता उद्यानांमध्ये येणाऱया आबालवृद्धांमुळे फुलून जातो.

बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
author img

By

Published : Oct 3, 2021, 7:44 AM IST

मुंबई : बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडीतील ओसाड जागेचे रुपांतर पाम उद्यान आणि सुगंधी उद्यानात करुन नंदनवन फुलवण्याची किमया महापालिकेच्या उद्यान विभागाने करुन दाखवल्याने या परिसराचे रुप पालटले आहे. कधीकाळी निर्मनुष्य भासणारा हा परिसर आता उद्यानांमध्ये येणाऱया आबालवृद्धांमुळे फुलून जातो. विशेष म्हणजे, या दोन्ही उद्यानांमध्ये असणाऱया शोषखड्डयांमुळे रिंगवेलद्वारे उपलब्ध होणारे पाणी उद्यानातील सिंचनासाठीच पुनर्वापरात येते. परिणामी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लीटर पाण्याची बचत करण्याची किमया देखील या उद्यानांनी साध्य केली आहे अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर

५ एकर क्षेत्रफळाचा ओसाड भूखंड
बोरिवली (पश्चिम) मधील चिकूवाडी येथे वसंत संकूल मागील परिसरात, मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेला सुमारे ५ एकर क्षेत्रफळाचा भूखंड सन २०१३ मध्ये महानगरपालिकेच्या ताब्यात आला. त्यावेळी ही जागा ओसाड स्वरुपाची व काहीशी दुर्लक्षितच होती. या भूखंडांच्या बाजूने एक मोठा नाला देखील वाहतो. स्वाभाविकच सदर परिसराच्या भौगोलिक विकासाला चालना मिळत नव्हती. त्यामुळेच हा परिसर काहीसा निर्मनुष्य होता. यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने मनोरंजन मैदानासाठी आरक्षित या जागेवर उद्यान विभागाच्या माध्यमातून संकल्पीय उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे परदेशी यांनी सांगितले.

बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
पाम व सुगंधी उद्यानया जागेच्या मधोमध रस्ता जात असल्याने एका बाजूस पाम उद्यान तर दुसऱया बाजूस सुगंधी उद्यान ही संकल्पना निश्चित करुन उद्यानाची निर्मिती सुरु करण्यात आली. महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने टप्प्या-टप्प्याने रोप लागवड करीत ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत दोन्ही उद्याने तर फुलवलीच, पण त्यातून संपूर्ण परिसराचा कायापालट देखील घडून आला. या उद्यानांमध्ये कोणतेही मोठे स्थापत्य बांधकाम करण्यात आले नसल्याने, अत्यंत वाजवी खर्चात उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. जवळपास ७ हजार ७९५ चौरस मीटर जागेवर फुललेल्या पाम उद्यानाचे ‘गोपीनाथ मुंडे मनोरंजन मैदान’ तसेच ६ हजार ८६२ चौरस मीटर जागेवरील सुगंधी उद्यानाचे ‘प्रमोद महाजन मनोरंजन मैदान’ असे नामकरण करण्यात आले आहे.
बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
पाम वृक्षाच्या एकूण १७ प्रजातीहे असे एकमेव ठिकाण आहे जिथे एकाच ठिकाणी पाम वृक्षाच्या एकूण १७ प्रजाती आहे. या सर्व प्रजाती मिळून सुमारे ७०० ते ८०० पाम वृक्ष येथे दिमाखात उभे आहेत. यामध्ये फॅन पाम, बॉटल पाम, त्रिकोणी पाम, खजूर, नारळ, सुपारी, शॅम्पेन पाम, रेड लॅटिन पाम, फॉक्सटेल पाम, फिशटेल पाम, बिस्मार्किया पाम, सिल्हर पाम, स्वाम्प फॅन पाम, लिव्हेस्टोनिया, मॅजेस्टिक पाम अशा विविध प्रजातीच्या पामची लागवड करण्यात आलेली आहे. सुगंधी उद्यानात निरनिराळ्या प्रकारची सुगंधी फुलझाडे एकाच ठिकाणी नांदत आहेत. या उद्यानाच्या एका बाजूने मोठा नाला वाहतो. ही बाब लक्षात घेऊन प्रामुख्याने देशी सुवासिक फुलझाडांच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. गुलाब, मोगरा, चाफा, कुंद, अनंत, प्राजक्त, कणेर, कामिनी, सायली, लिली, मधूमालती, केवडा अशा सुवासिक फुलझाडांबरोबरच गवती चहा, बासमती, अडुळसा, तुळशी अशा औषधी वनस्पतींची सुद्धा लागवड या उद्यानात केली आहे.
बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
बोरिवलीत ओसाड जागेचे नंदनवनात रुपांतर
पाण्याची बचतया दोन्ही उद्यानांना मिळून दररोज सुमारे ६५ हजार लीटर पाण्याची सिंचनासाठी आवश्यकता असते. मात्र, उद्यानांमध्ये शोष खड्डे तयार करुन, त्यातून उपलब्ध होणाऱया पाण्याचा वापर हा उद्यानांतील सिंचनासाठी करण्यात येतो. परिणामी दररोज सुमारे ३० ते ४० हजार लीटर पाण्याची बचतही याठिकाणी होते अशी माहिती परदेशी यांनी दिली.

हेही वाचा - राणीच्या बागेत पेंग्विनच्या दुसऱ्या पिढीचा जन्म; महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.