ETV Bharat / city

बेशिस्त मुंबईकर.. महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून वसूल केला ३९ लाखांचा दंड - सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबईत कोरोनाचा प्रसार असल्याने मास्क लावणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या ९ महिन्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १९ हजाराहून अधिक नागरिकांवर कारवाई करत पालिकेने ३९ लाख १३ हजार १०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे

pitting_fine
pitting_fine
author img

By

Published : Aug 7, 2021, 1:43 AM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार असल्याने मास्क लावणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या ९ महिन्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १९ हजाराहून अधिक नागरिकांवर कारवाई करत पालिकेने ३९ लाख १३ हजार १०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती उप आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी दिली. विशेष म्हणजे मुंबई महापालिका मुख्यालयाच्या परिसर असलेल्या ए विभागात, कुर्ला येथील एल विभाग, मरिन लाईन्स येथील सी विभागात सर्वाधिक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे.

ए विभागात सर्वाधिक दंड वसुली -

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध व्हावा, यादृष्टीने जनजागृतीपर व दंडात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे २०० रुपये इतका दंड आकारण्यात येतो. याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार फोर्ट कुलाबा येथील महापालिका मुख्यालय असलेल्या ‘ए’ विभागाच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. ए विभागात ६ लाख १५ हजार ८०० रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. या खालोखाल कुर्ला ‘एल’ विभागातून रुपये ०६ लाख १२ हजार २००, तर मरिन लाईन येथील ‘सी’ विभागातून रुपये ०४ लाख ५२ हजार २०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार -

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – २००६’ या नियमाची कड़क अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने मास्क न घालणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत, दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

अशी झाली दंड वसुली -

ए विभाग - रुपये ६,१५,८००/-
बी विभाग - रुपये ३,२२,२००/-
सी विभाग - रुपये ४,५२,२००/-
डी विभाग - रुपये २,५७,२००/-
ई विभाग - रुपये २०,०००/-
एफ दक्षिण विभाग - रुपये २,१७,४००/-
एफ उत्तर विभाग - रुपये ५०,६००/-
जी दक्षिण विभाग - रुपये २६,०००/-
जी उत्तर विभाग - रुपये २५,९००/-
एच पूर्व विभाग - रुपये १,७१,४००/-
एच पश्चिम विभाग - रुपये २५,८००/-
के पूर्व विभाग - रुपये २७,०००/-
के पश्चिम विभाग - रुपये ९५,६००/-
पी दक्षिण विभाग - रुपये १,०५,८००/-
पी उत्तर विभाग - रुपये ३,७९,६००/-
आर दक्षिण विभाग - रुपये ३४,३००/-
आर मध्य विभाग - रुपये ४३,८००/-
आर उत्तर विभाग - रुपये १,१९,८००/-
एल विभाग - रुपये ६,१२,२००/-
एम पूर्व विभाग - रुपये २०,४००/-
एम पश्चिम विभाग - रुपये १,१६,८००/-
एन विभाग - रुपये ७१,३००/-
एस विभाग - रुपये ९०,४००/-
टी विभाग - रुपये ११,६००/-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.