ETV Bharat / city

विना मास्क कारवाई : बुधवारी १३ हजार जणांवर, तर एकूण १५ लाख नागरिकांकडून ३० कोटीचा दंड वसूल - corona latest news

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते.

BMC collected over rs 30 crore
विना मास्क कारवाई
author img

By

Published : Mar 4, 2021, 7:49 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मास्क न घालणाऱ्या लोकांचे वाढले आहे. यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर पालिकेकडून कडक कारवाई केली जात आहे. २० एप्रिल ते १६ फेब्रुवारी या कालावधीत १५ लाख १६ हजार ३९८ विना मास्क नागरिकांवर कारवाई करत ३० कोटी ६९ लाख ९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

विना मास्क नागरिकांवर कारवाई -

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आज दिवसभरात १३,५५७ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत २७ लाख ११ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर आतापर्यंत १५ लाख १६ हजार ३९८ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ३० कोटी ६९ लाख ९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कारवाई नंतर मास्क मोफत -

मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जात आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जात आहे.

कारवाईसाठी पथक -

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी बैठक घेऊन विना मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार केली आहेत. या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. विना मास्क नागरिकांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच क्लीन-अप मार्शल ही नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कार्यवाही अत्यंत महत्वाची ठरते आहे.

कोणत्या विभागात किती कारवाई -

झोन व्यक्ती दंड रुपये
झोन १ - २,२३,२२१ - ४,५२,१४,७००
झोन २ - २,७९,१७८ - ५,६१,६८,९००
झोन ३ - २,१४,५३८ - ४,४१,९१,२००
झोन ४ - २,३७,१०३ - ४,७९,६६,०००
झोन ५ - १,६८,४३६ - ३,३९,०३,९००
झोन ६ - १,९७,७२० - ३,९५,८८,६००
झोन ७ - २,०९,७५९ - ४,२५,८७,९००
एकूण - १५,२९,९५५ -३०,९६,२१,२००

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.