ETV Bharat / city

मुंबई महापालिकेकडून सुमुद्रकिनारी छट पूजेला बंदी, 'असे' आहेत नियम - मुंबई महापालिका छट पुजा बंदी

मुंबई महापालिकेने काढलेल्या परिपत्रकानुसार, मुंबईमध्ये दर महिन्याला 13 ते 14 हजार कोविडचे रुग्ण आढळून येत आहेत, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सण मर्यादित स्वरूपात साजरे करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. त्यामुळे छट पुजेसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे.

छट पुजा
छट पुजा
author img

By

Published : Nov 2, 2021, 7:24 PM IST

मुंबई - उत्तर भारतातील नागरिक दरवर्षी मुंबईमध्ये छट पूजा हा सण मोठया प्रमाणात साजरा करतात. या सणादरम्यान समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यंदाही छट पूजा हा सण कोरोना नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्याची परवानगी मुंबई पालिका प्रशासनाने दिली आहे. छट पूजा हा सण समुद्रकिनारी न करता पूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करावेत असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

मुंबई महापालिकेने काढलेल्या परिपत्रकानुसार, मुंबईमध्ये दर महिन्याला 13 ते 14 हजार कोविडचे रुग्ण आढळून येत आहेत, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी सण मर्यादित स्वरूपात साजरे करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. त्यामुळे छट पुजेसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे.

हेही वाचा-देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

असे आहेत छट पुजेचे नियम-

  • समुद्रकिनारी छटपूजेला होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषता सामाजिक अंतर राखण्याचे पालन होणार नाही. त्या अनुषंगाने समुद्रकिनारी सामूहिक छटपूजाचे आयोजन टाळावे व छटपूजा उत्सवांसाठी भाविक जमा होणार नाही याची पोलिस विभागाने दक्षता घ्यावी.
  • विभाग स्तरावर छटपूजेसाठी परवानगी मागणाऱ्या संस्थेचे कृत्रिम तलाव स्वखर्चाने बांधण्यासाठी मान्यता देण्यात यावी.
  • पूजेनंतर कृत्रिम तलाव बुजवण्याची जबाबदारी सदर संस्थेची असेल. या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे शक्य व्हावे म्हणून दक्षता घ्यावी.
  • मास्कचा वापर योग्यरित्या होत आहे याची खबरदारी घ्यावी.
    खुल्या प्रांगणात सोहळ्यासाठी क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती मर्यादा असेल.
  • बंदिस्त कार्यालयांमध्ये होणार या सोहळ्यासाठी क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती ही मर्यादा असेल.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये तसेच कोरोना नियमांचे पालन व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर पोलिस विभागाची मदत देण्यात यावी.
  • भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना सामूहिक स्थळी पुजे मध्ये सहभागी होता येईल.
  • छट पूजा आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात यावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विभागस्तरावर कोरोना प्रसाराच्या पार्शवभूमीवर वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची चाचणी करण्यात यावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावे. या परिसरात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • लागू करण्यात आलेले निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील त्यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही असे परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा-छट पूजा आणि दिवाळीसाठी रेल्वे गाड्या हाऊसफुल; बहुतांश गाड्या प्रतीक्षा यादीत!

छटपुजेला गावी जाण्यासाठी मुंबईतील उत्तर भारतीय नागरिकांची लगबग

दरवर्षी छटपूजा आणि दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबई आणि उपनगरात काम करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात बिहार आणि उत्तर प्रदेशात जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता असताना सुद्धा छटपूजा आणि दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाण प्रवाशांनी रेल्वेचे आरक्षण केले आहे. या सणाला चार महिने बाकी असताना सुद्धा उत्तरप्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल झालेल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.