ETV Bharat / city

दसरा मेळाव्यास शिवतीर्थ न मिळाल्यास बिकेसीचा पर्याय, शिवसेनेकडून पर्यायी जागेसाठी पत्र

author img

By

Published : Sep 14, 2022, 6:11 PM IST

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटांमध्ये जुंपली आहे. मेळाव्यासाठी जागेचा वाद निर्माण झाल्याने शिवसेनेकडून आता बीकेसी मैदानाच्या पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे (BKC if Shivatirtha is not available). शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला परवानगीसाठी आज पत्रव्यवहार केला आहे (Dussehra gathering letter from Shiv Sena).

दसरा मेळाव्यास शिवतीर्थ न मिळाल्यास बिकेसीचा पर्याय

मुंबई - शिवसेनेची 56 वर्षांची परंपरा असलेल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटांमध्ये जुंपली आहे. मेळाव्यासाठी जागेचा वाद निर्माण झाल्याने शिवसेनेकडून आता बीकेसी मैदानाच्या पर्यायी जागेची मागणी करण्यात आली आहे (BKC if Shivatirtha is not available). शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला परवानगीसाठी आज पत्रव्यवहार केला आहे (Dussehra gathering letter from Shiv Sena).

जागेच्या वादामुळे दसरा मेळावा घेण्यास अडथळा - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन सुरतमध्ये जाऊन शिवसेना विरोधात बंड पुकारला. तसेच खरी शिवसेना आमची असल्याचा दावा केला. हा वाद न्यायालयात आहे. यंदाच्या दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाने तयारी केली आहे. मुंबई महापालिकेकडे दादरच्या शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जाची छाननी पालिका प्रशासनामार्फत सुरू आहे. अर्ज छाननी नंतर शिवतीर्थ कोणाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र जागेच्या वादामुळे दसरा मेळावा घेण्यास अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटाकडून पर्यायी जागेची चाचपणी सुरू आहे.

शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट ठाम - शिंदे गटाची नुकतीच बैठक पार पडली. शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट ठाम आहे. शिवसेनेने देखील दावा केल्याने मनपाने शिवाजी पार्क मैदानाला परवानगी न दिल्यास बंडखोर शिंदे गटाने वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानाचा पर्याय निवडला आहे. एमएमआरडीएला यासंदर्भातील पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. आता शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे आज पत्र दिले आहे. त्यामुळे शिवाजी पार्क नंतर आता बीकेसीतील मैदानासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.