मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी, दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर 15 मे पासून बंद आहे. हे कोविड सेंटर सुरू होणार असे म्हणता म्हणता आता आणखी काही दिवस हे तिन्ही कोविड सेंटर बंदच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे सध्या कोविड सेंटरची तितकीशी गरज नसल्याचे म्हणत बृहन्मुंबई महानगर पालिकेने ही तिन्ही सेंटर तूर्तास तरी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या लाटेत सेंटर सुरू होणार?
बीकेसी, दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर परिसरात पाणी साचण्याची आणि वाऱ्यामुळे काही नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता 15 मे पासून ही तिन्ही सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत. या सेंटरमधील रुग्ण इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. दरम्यान वादळ गेल्या नंतर काही दिवसांनी कोविड सेंटर सुरू करू असे पालिकेने सांगितले होते. पण वादळात कोविड सेंटरचे थोडे फार नुकसान झाले आहे. त्यामुळे आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी वेळ देत 1 जूनपासून पासून कोविड सेंटर सुरू करू, असे पालिकेने सांगितले. पण 1 जूनलाही तिन्ही कोविड सेंटर सुरू झालेले नाहीत. तर आता मुंबईतील रुग्ण संख्या खूपच कमी झाल्याने आणि सेंटरची, बेडची आवश्यकता नसल्याने कोविड सेंटर तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर तिसरी लाट आली आणि त्यात रुग्ण संख्या वाढल्यास हे सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही समजते आहे.
बीकेसी, दहिसर, मुलुंड कोविड सेंटर बंदच राहणार?
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी, दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर 15 मे पासून बंद आहे. हे कोविड सेंटर सुरू होणार असे म्हणता म्हणता आता आणखी काही दिवस हे तिन्ही कोविड सेंटर बंदच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.