ETV Bharat / city

'पदवीधर निवडणुकीतील अपयशातून सावरून भाजप ग्रामपंचायतीत चांगलं यश मिळवेल'

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एकटा असल्याने त्यांच्यासमोर तिन्ही पक्षाचे आव्हान असणार आहे. मात्र तळागाळातील पन्ना प्रमुखांनी गावाकडच्या प्रश्नांना घेऊन, गावा-गावात पोहचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नक्कीच पदवीधर निवडणुकीतील अपयशातून आम्ही या ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी होऊ, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

author img

By

Published : Dec 18, 2020, 7:47 PM IST

BJP will get better success in Gram Panchayat
भाजप ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी होईल

मुंबई - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. पदवीधर निवडणुकीनंतर आता राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यात असल्याने यावेळी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. त्यात भाजपला पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या अपयशाने भाजपने पंचायत निवडणुकीत कंबर कसली आहे.

तिन्ही पक्षांचे आव्हान -

या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यास निवडणुकीत भाजप एकटी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक निवडणुकीत तीन पक्षाची एकत्र मूठ बांधायची कशी? याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे. त्यातच भाजप एकटा पक्ष असल्याने त्यांच्यासमोर देखील तिन्ही पक्षाचे आव्हान आहे मात्र तळागाळातील पन्नाप्रमुखांनी गावाकडच्या प्रश्नांना घेऊन, गावा-गावात पोहचण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नक्कीच पदवीधर निवडणुकीचे अपयशातून आम्ही या ग्राम पंचायत निवडणुकीत यशस्वी होऊ, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले.

केशव उपाध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना
तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपचा फायदा-महाविकास आघाडीतील पदाधिकारी व इच्छुक निवडणुकीसाठी बंडखोरी होण्याची शक्यता असून ती भाजपाच्या पथ्यावर पडू शकेल. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रमुख पक्षांनी गावनिहाय पॅनल उभारणीसाठी चाचपणी सुरू केली आहे. तशीच चाचपणी आणि काही ऑपरेशन ग्रामपंचायतीत करता येतंय का, हे भाजप नेते मंडळी सध्या गावागावात माहिती काढून रिसर्च करत आहेत.राज्यात 14,000 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी -विविध जिल्ह्यात येत्या 15 जानेवारी रोजी जवळ-जवळ 14000 ग्रामपंचायतीमध्ये मतदान होणार आहे. ग्रामपंचायतीची संख्या पाहता भाजपनेही तयारीला सुरुवात केली असून प्रत्येक गावात पन्ना प्रमुख या त्यांच्या रचनेनुसार कामाला सुरुवात केलेली आहे. मतदार यादीतील किती मतदार भाजपच्या समर्थनार्थ असतील आणि किती किती विरोधात असतील याची चाचपणीही पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी केवळ स्थानिक नेतेच नाही,तर राज्य पातळीवरील भाजप मोठे नेतेही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात भाग घेणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.