ETV Bharat / city

मुंबईतील प्रभाग रचना बदलल्यास भाजप आव्हान देणार - ward structure in Mumbai

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनांचा कच्चा आराखडा बनवण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत.

bmc
मुंबई पालिका
author img

By

Published : Aug 27, 2021, 9:15 PM IST

Updated : Aug 27, 2021, 9:58 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत प्रभाग रचना बदलून भाजपाने आपले मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणले असा आरोप केला जात आहे. त्यासाठी काँग्रेसकडून प्रभाग रचना पुन्हा बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनांचा कच्चा आराखडा बनवण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. हा आराखडा बनवताना प्रभाग रचनेत अन्यायकारक बदल केल्यास त्याला भाजपा आव्हान देईल, असा इशारा पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.

माहिती देताना मुंबई महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे
  • भाजपाला बसू शकतो फटका -

मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकांपूर्वी २०१६ मध्ये प्रभाग रचना बदलण्यात आली होती. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. २०१२ च्या निवडणुकीत भाजपचे ३२ नगरसेवक होते. २०१७ च्या निवडणुकीत त्यांची संख्या वाढून ८२ इतकी झाली. प्रभाग रचना बदलल्याने भाजपाला फायदा झाला असा आरोप गेले पाच वर्ष केला जात आहे. यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रभाग रचना बदलण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रभाग रचना बदलण्यासाठी सूचना व हरकती मागवण्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. त्यातच आता निवडणूक तोंडावर असताना निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आरखडा बनवा असे आदेश महापालिकांना दिले आहेत. यामुळे येत्या निवडणुकीपूर्वी प्रभाग पुनर्र्चना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास त्याचा फटका भाजपाला बसू शकतो.

  • काय आहेत निवडणूक आयोगाचे आदेश -

राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिका निवडणुका एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीने घेण्याचे जाहीर केले आहे. तसेच प्रभाग रचनांचा कच्चा आराखडा बवण्यास महापालिकांना सांगितले आहे. मुंबईमध्ये एक प्रभाग एक नगरसेवक हि पद्धत आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका मुंबईमधील नगरसेवकांना बसणार नाही. मात्र निवडणूक आयोगाने प्रभाग रचनांचा कच्चा आराखडा बवण्यास सांगितले आहे. प्रभागाचे प्रारूप रचनाचे काम २७ ऑगस्टपासून हाती घेण्यात यावे तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, असेही निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

  • तर आव्हान देऊ -

शहरात मोठा पूल बांधण्यात आला, एखादा मोठा रस्ता बांधण्यात आला, एखादी मोठी वस्ती स्थलांतरित झाली तरच प्रभाग रचना बदलण्यात येते. महापालिकेची निवडणूक २०११ च्या जणगणने नुसार होणार आहे. त्यानुसार २०१७ च्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना बदलण्यात आली होती. गेल्या ५ वर्षात मुंबईत मोठे बदल झालेले नाहीत. यामुळे प्रभाग रचना बदलणे योग्य होणार नाही. त्यानंतरही प्रभाग रचनेत मोठे बदल झाल्यास त्याला भाजपा नियमानुसार आव्हान देईल असे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

  • या महापालिकांची निवडणूक -

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मीरा - भाईंदर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड, वाघाळा, लातूर अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महानगरपालिकांची मुदत २०२२ मध्ये संपणार आहे. त्यामुळे या महापालिकांच्या आयुक्तांना प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. मागील सरकारने चार सदस्यीय प्रभागरचना केली होती. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने ३१ डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील महापालिकांमधील बहुसदस्य पद्धत बंद करून एक प्रभाग पद्धतीचा कायदा केला आहे.

हेही वाचा - पोलीस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालतंय - चंद्रकांत पाटील

Last Updated : Aug 27, 2021, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.