ETV Bharat / city

जिल्हा बॅंकांच्या निवडणुकीत भाजपची बाजी.. महाविकास आघाडीला आगामी निवडणुकांची धास्ती - महाविकास आघाडी

राज्यात सध्या जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मनोरथ उधळून लावत, अनेक ठिकाणी वर्चस्व प्रस्तापित केले आहे. यंदा 18 महापालिकांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. बॅंकांच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्याने आता आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी धास्तावल्याचे बोलले जात आहे.

BJP victory in district bank elections
BJP victory in district bank elections
author img

By

Published : Jan 4, 2022, 8:14 PM IST

मुंबई - राज्यात सध्या जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मनोरथ उधळून लावत, अनेक ठिकाणी वर्चस्व प्रस्तापित केले आहे. यंदा 18 महापालिकांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. बॅंकांच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्याने आता आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी धास्तावल्याचे बोलले जात आहे.

भाजपाची बाजी -

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर राज्यात सत्ता स्थापनेचे नाट्य पार पडले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी अजित पवार यांच्यांशी हातमिळवणी केली. तर राष्ट्रवादी- कॉंग्रेसवर आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडणाऱ्या शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी समान किमान कार्यक्रम जाहीर करत महाविकास आघाडी सरकार स्थापन करत सत्तेवर आले. परंतु, मागील दोन वर्षात झालेल्या राज्यसभा, लोकसभा, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहिला आहे. आताही पुणे वगळता मुंबईसह सिंधुर्दुग, बीड जिल्ह्यातील बॅंकांच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीचे पाणिपत झाल्याचे दिसून येते.

भाजपला वेसन घालण्यासाठी महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी

राज्यात महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना रंगलेला आहे. आघाडीमुळे सत्ताधाऱ्यांच्या जागा वाढतील, अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र, आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत भाजपने महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. आघाडी सरकारमधील अंतर्गत मतभेदाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसत असल्याची चर्चा आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून स्वबळाचा नारा, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीत लढण्याची भाकित वर्तवली जात आहेत. परंतु, भाजपला थोपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली असून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपला वेसन घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काय योजना आखणार, हे आगामी काळात पहायला मिळणार आहे.

तिन्ही पक्षांनी एकसंघ उभे राहावे -

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ओबीसी, धनगर, मराठा आरक्षणापासून शेती, बेरोजगारी, सरकारी नोकरी भरतीतील गैरव्यहार सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. जनतेत सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सरकारमध्ये वर्चस्व, तर शिवसेनेतील नेत्यांमध्ये प्रस्थापितांची भावना निर्माण झाल्याने सरकारला कच खावी लागत आहे. तिन्ही पक्ष एकसंघ उभे राहिल्यासच भाजपला नामोहरण करणे शक्य होईल, असे मत राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार अरविंद सुर्वे यांनी ईटीव्ही भारतकडे व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.