मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP) विधान परिषद ( Legislative Council ) निवडणुकीत सहयोगी मित्रपक्षांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. माजी कृषी राज्यमंत्री आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उमेदवारीसाठी आग्रही मागणी केली होती. अखेरीस शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने आपला सहावा उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या रूपाने रिंगणात उतरवला आहे. सदाभाऊ खोत यांनी विधान भवनात येवून उमेदवारी अर्ज दाखल केला.
हर्षवर्धन पाटलांचा पत्ता कट - भाजप सहावा उमेदवारही जाहीर उभा करणार अशी चर्चा आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात सुरू होती. हर्षवर्धन पाटील यांचे नाव याआधी सहावा उमेदवार म्हणून चर्चेत आले होते. आता सदाभाऊ खोत यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे नाव उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर झाले आहे.