ETV Bharat / city

भाजपची विधानसभा तयारी, जनतेसमोर विकास कामे घेऊन जाणार- मुनगंटीवार

लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजप राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. या संदर्भात नुकतीच त्यांची आढावा बैठक पार पडली.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : May 22, 2019, 9:30 AM IST

मुंबई - लोकसभेत पुन्हा एकदा जनतेने भाजपला कौल दिला आहे. आता विधानसभेची तयारी सुरू आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने अनेक विकास कामे केली आहेत, ती कामे जनतेसमोर घेऊन जाणार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. लोकसभा आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा आनंदाने संधी दिली आहे. त्यांनी केलेल्या अनेक कामांची ती पावती आहे. राज्यातही अनेक कामे झाली आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत 20 हजार कोटींची रक्कम कर्जमुक्तीसाठी देण्यात आली आहे. तर 4 हजार कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत कर्जमुक्ती योजना सुरूच राहील असेही त्यांनी सांगितले. अशीच लोकाभिमुख कामे जनतेच्या समोर घेऊन जाणार आहोत. मात्र, त्याचा कार्यक्रम निश्चित झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:सूचना- LIVE U वरून सुधीर मुनगंटीवार यांचा byte पाठवला आहे.

भाजपची विधानसभेची तयारी, विकास कामे जनतेसमोर घेऊन जाणार- मुनगंटीवार

मुंबई 21

लोकसभेत पुन्हा एकदा जनतेने भाजपला कौल दिला असून आता विधानसभेची ही तयारी सुरू आहे. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने अनेक विकास कामे केली आहे, ती कामं जनतेसमोर घेऊन जाणार असल्याचे भाजपचे जेष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. लोकसभा आढावा बैठकी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Body:भारताला जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा आनंदाने संधी दिली आहे. त्यांनी केलेल्या अनेक कामांची ती पावती आहे.राज्यातही अनेक कामे झाली आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत 20 हजार कोटींची रक्कम कर्जमुक्ती साठी देण्यात आली आहे. तर 4 हजार कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत कर्जमुक्ती योजना सुरूच राहील असेही त्यांनी सांगितले. अशीच लोकाभिमुख कामे जनतेच्या समोर घेऊन जाणार आहात, मात्र त्याचा कार्यक्रम निश्चित झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.