मुंबई - विद्यमान आमदार राम कदम यांना घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे . आज (गुरुवार) राम कदम यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत विक्रोळी वर्षानगर येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आयोजित केलेल्या भव्य रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु, सेनेच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीकडे पाठ फिरवलेली दिसून आली.
हेही वाचा - मनसेची तिसरी यादी जाहीर, 32 जणांच्या नावाचा समावेश
सकाळी घाटकोपरमध्ये विविध ठिकाणी राम कदम यांना मतदान करणार नाही, अशी बॅनरबाजी कट्टर शिवसैनिकांच्या नावाने करण्यात आली होती. त्यात आज राम कदम यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनातही शिवसैनिकांच्या अनुपस्थितीमुळे घाटकोपरमध्ये सेना-भाजपमध्ये आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा - पवार साहेबांनी काय केलं हे 'उपऱ्यां'नी विचारू नये; मोदी-शाहांवर कोल्हेंचा निशाणा
युवानेते आदित्य ठाकरे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असल्यामुळे सर्व शिवसैनिक हे वरळीला आदित्य ठाकरे यांच्या रॅलीसाठी गेले होते, असे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे राम कदम यांच्या पाठीशी असून निश्चितच राम कदम यांचा विजय होईल, अशी अपेक्षा खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केली आहे.