ETV Bharat / city

महापालिकेला दिवाखोरीकडे नेणारा अर्थसंकल्प; भाजप प्रक्त्यांचा आरोप

पालिकेचा अर्थसंकल्प उदासीन असून यामध्ये आकड्यांचा फुगवटा असल्याची टीका भाजपचे मनपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली. मुंबईकरांवर नवे कर लावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आम्ही विरोध करू, असा इशारा त्यांनी दिलाय.

author img

By

Published : Feb 5, 2020, 1:43 PM IST

yashwant jadhav BJP
पालिकेचा अर्थसंकल्प उदासीन असून यामध्ये आकड्यांचा फुगवटा असल्याची टीका भाजपचे मनपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली.

मुंबई - महसुलात घट झाल्याने मुंबईचा विकास खुंटल्याची टीका भाजपचे मनपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे. हा अर्थसंकल्प उदासीन असून यामध्ये आकड्यांचा फुगवटा असल्याची टीका त्यांनी केली. मुंबईकरांवर नवे कर लावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आम्ही विरोध करू, असा इशारा त्यांनी दिला. 2020-21चा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेला दिवाळखोरीकडे नेणारा आणि मुंबईकरांचे कंबरडे मोडणारा असल्याची टीका यावेळी भाजपने केली.

पालिकेचा अर्थसंकल्प उदासीन असून यामध्ये आकड्यांचा फुगवटा असल्याची टीका भाजपचे मनपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली.

महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांनी सादर केला. 33 हजार 441.02 कोटींच्या या अर्थसंकल्पामुळे सेवाशुल्काच्या नावाखाली सक्तीची वसुली सुरू होणार आहे, असे ते म्हणाले.

मुंबईमधील वृक्षतोडीच्या प्रकरणाबाबत बोलताना, शिवसेनेची कथनी आणि करणीत फरक असल्याचे ते म्हणाले. 25 हजार झाडे तोडण्यासाठी मंजुरी देणारी शिवसेना वृक्ष तोडीसाठी मेट्रोच्या मुळावर का येते, याचे स्पष्टीकरण शिवसेनेने करावे, असे शिरसाट म्हणाले. मुंबईत विकास कामे सुरू असताना त्याआड येणारी झाडे कापणार, की विकास कामांना स्थगिती देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कर नव्हे; तर सेवा शुल्काचे गोंडस नाव देऊन अतिरिक्त करवाढ करण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला. या नवीन करांमुळे मुंबईकरांचे निश्चित कंबरडे मोडणार असल्याचे शिरसाट म्हणाले.

Intro:मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा २०२० - २१ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांनी आज सादर केला. हा अर्थसंकल्प उदासीन आणि आकडे फुगवेलला अर्थसंकल्प असल्याची टिका विरोधी पक्षांनी केली आहे. या अर्थसंकल्पात नवे असे काही नसल्याने मुंबईकरांना यामधून काहीही मिळणार नसल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. मुंबईकरांवर नवे कर लावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आम्ही विरोध करू असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. हा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेला दिवाळखोरीकडे नेणारा आणि मुंबईकरांचे कंबरडे मोडणारा असल्याची टिका भाजपाकडून करण्यात आली आहे. तर हा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या हिताचा असून त्यात आवश्यक असलेले बदल स्थायी समितीमध्ये चर्चे दरम्यान केले जातील असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
Body:नवे कर लावण्यास विरोध करू - काँग्रेस, राष्ट्रवादी
मुंबई महानगरपालिकेचा सन २०२० - २१ चा ३३ हजार ४४१.०२ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सादर केला. सन २०१९ - २० चा अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटींचा होता. २०२० - २१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७४८.४३ कोटींनी जास्त आहे. अर्थसंकल्पात ८.९५ कोटींनी वाढ झाली आहे. याबाबत बोलताना अर्थसंकल्पात नवीन असे काही नाही. मुंबईकरांना नवीन असे कोणतेही प्रकल्प देण्यात आलेले नाहीत. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पात आकडे बदलले आहेत. हा स्वप्न दाखवणारा उदासीन अर्थसंकल्प असल्याची टिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. तुम्ही काम करून दाखवा असे आवाहन त्यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला केले आहे. कचरा संकलन करणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. त्यावर कर लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आम्ही विरोध करू असा इशारा रवी राजा यांनी दिला आहे. मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प मुंबईकरांना दिशा देणारा नाही. देशात आर्थिक मंदी आहे. त्याचे पडसाद कुठेतरी या अर्थसंकल्पात दिसत आहेत. त्यामुळे आर्थिक मंदीचा फटका बसल्याचे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. एकीकडे मुंबईकरांसाठी मोठ मोठे प्रकल्प आपण राबवत आहोत पण दुसरीकडे मुंबईकरांना किंवा सर्वसामान्यांना ज्या सोयीसुविधा हव्या आहेत त्याबाबत मुंबई महापालिकेचे धोरण अत्यंत उदासीन आहे. मुंबईकरांसाठी कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा या अर्थसंकल्पात दिसत नाहीत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी व्यक्त केली.

दिवखोरीकडे नेणारा अर्थसंकल्प - भाजपाची टिका
हा अर्थसंकल्प आनंदी आनंदगडे आहे. आनंदी मुंबईसाठी महसुलात घट झाली आणि मुंबईचा विकस खुंटला आहे. अशावेळी खोटे आणि फुगवलेले आकडे देऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. कुठलीही करवाढ नाही असे सांगताना सेवाशुल्काच्या नावाखाली सक्तीची वसुली सुरु होणार आहे. याचा त्रास मुंबईकरांना होणार आहे. म्हणून कुठलाही नवीन संकल्प नसलेला अर्थहीन आणि मुंबई महापालिकेला दिवाळखोरीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे अशी टिका भाजपाचे महापालिका प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे. मुंबईमधील झाडे तोडण्याबाबत बोलताना शिवसेनेची कथनी आणि करणीत फरक असल्याचे शिवसेनेबाबत महाराष्ट्राने नेहमीच अनुभवले आहे. २५ हजार झाडे तोडण्यासाठी मंजुरी देणारी शिवसेना वृक्ष संवर्धनासाठी मेट्रोच्या मुलावर का येते याचे स्पष्टीकरण शिवसेनेने करावे असे आवाहन शिरसाट यांनी केले. मुंबईत विकास कामे सुरु असताना त्याआड येणाऱ्या झाडांना कि विकास कामांना स्थगिती देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबा महापालिका दिवाळखोर झाल्याशिवाय राहणार नाही असा दावा शिरसाट यांनी केला आहे. कर नाही तर त्यांना सेवा शुल्काचे गोंडस नाव देऊन अतिरिक्त करवाढ केलेली आहे. मुंबईकरांचे यामुळे निश्चित कंबरडे मोडणार असल्याचे शिरसाट म्हणाले.

मुंबईकरांच्या हिताचा अर्थसंकल्प - यशवंत जाधव
पालिका आयुक्तांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सुखावह आणि सुखकर असा आहे. त्यात काही सुधारणा करता येऊ शकतात. शाळा आणि आरोग्य यासाठी केलेल्या तरतुदींमध्ये बदल होणे गरजेचे आहे. काही मुद्दे राहून गेले असल्यास ते सामावून घेतले जातील. स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा करताना ते बदल केले जातील. मुंबईकरांना अपेक्षित असलेला अर्थसंकल्प आणि नागरी सुविधा देऊ असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. पालिकेमधील नोकरभरती थांबवण्यात आलेली नाही. महसूलवाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत, महसुलात सुधारणा झाल्यावर नोकर भरती करण्यासाठी पालिका प्रशासनाला आम्ही भाग पाडू असे जाधव यांनी सांगितले.

बातमीसाठी विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा बाईट कॅमेरामन अनिल निर्मल यांनी लाईव्ह यु ०७ वरून पाठवला आहे.
भाजपाचे पालिकेतील प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांचा बाईट सोबत पाठवला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.