मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ( After The Revolt of Eknath Shinde ) शिवसेनेत उभी फूट
( Vertical Split in Shiv Sena ) पडल्याने सरकार अल्पमतात आले. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली, त्यानंतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेने निदर्शने केली. शिंदे गटसुद्धा आता सक्रिय झाला असून, शिवसेनेला प्रत्येक कायदेशीर बाबींना ते उत्तर देत आहेत. नुकताच सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिल्यामुळे, शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. ( ( BJP Move to Establish Power )
बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा : नुकतेच विधान सभा उपाध्यक्षांकडे शिवसेनेने बंडखोर आमदारांविरोधात अविश्वास ठराव सादर केला होता. तसेच, गटनेता नियुक्तीपत्रसुद्धा दिले होते. त्यामुळे याविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाल्यानंतर बंडखोर आमदारांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना 11 जुलैपर्यंत त्यांच्यावर अविश्वास ठराव होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या नियुक्त्या ह्याच ग्राह्य धरण्यात येतील. तसेच, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि शिवसेना पुरस्कृत प्रतोद अजय चौधरी यांना नोटीसा बजावल्या आहेत.
शिंदे गट भाजपसोबत जाण्यास उत्सुक : शिंदे गटाचा आग्रहच आहे की, आपण भाजपसोबत सर्व भाजपसोबत जाऊ. तसे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा पत्रा द्वारे कळवले आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपसोबत सरकार स्थापन करू शकते.
भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू : महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना, शिंदेगटाचा भाजपला पाठिंबा असल्यामुळे इकडे भाजपच्या गुप्तपणे बैठकीचे सत्र जोरात चालू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत बैठका चालू आहेत. आता सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांना दिलासा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाची बैठक झाली. या बैठकी सर्व आमदारांना संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत येण्याच्या सूचना भाजपच्या आमदारांना देण्यात आल्या आहेत. 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असेल, त्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis : बंडखोरांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवळांना नोटीस