मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाद्वारे १४०० इलेक्ट्रिक बस घेतल्या जाणार आहेत. या निविदांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत या बस खरेदीची सीव्हीसी व सीएजी यंत्रणांकडून चौकशी करावी ( BEST electric bus enquiry ) अशी मागणी भाजपचे मुलुंड येथील आमदार मिहीर कोटेचा यांनी केली ( Mihir Kotecha demands BEST electric bus enquiry ) आहे. याबाबत पत्र लिहिणार असल्याचे कोटेचा यांनी सांगितले.
बस खरेदीची चौकशी करा - बेस्ट उपक्रमाने १४०० इलेक्ट्रिक बसेस खरेदीचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीन टेक या कंपनीला मिळावा म्हणून काढले आहे. आपल्या मर्जीव्यतिरिक्त इतर कंपन्यांना कंत्राट मिळू नये, इतर कंत्राटदार निविदेमध्ये सहभागी होणार नाहीत अशा निविदा काढल्या जात आहेत असा आरोप कोटेचा यांनी केला. इलेक्ट्रिक बस घेता याव्यात म्हणून केंद्र सरकारने दिलेले २३४ कोटी बेस्टच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतरही केंद्र सरकार निधी देत नाही अशी बोंब मारायची हे योग्य नाही. आम्ही हे चालू देणार नाही, केंद्राच्या निधीवर डल्ला मारू नये यासाठी या बस खरेदीची सखोल चौकशी व्हाव्ही अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे. बस खरेदीची चौकशी व्हावी. यासाठी सीव्हीसी आणि सीएजी (CAG) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कोटेचा यांनी संगितले.
आदित्य ठाकरे टार्गेट - आदित्य सेना मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार करण्याची एकही संधी सोडत नाही. आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट मिळावे याची सोय प्रशासनाला दबावात आणून केली जात आहे. अशी टीका कोटेचा यांनी केली आहे. अशी टीका करून भाजपकडून थेट आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात आले आहे.