मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला ५० दिवस उलटून गेले असतानाही पोलिसांनी साधा एफआयआर देखील दाखल केला नाही. तसेच दिशा सालियनाच्या आत्महत्येनंतर ५० दिवसांनी या संदर्भातील माहिती असल्यास ती आम्हाला द्यावी, असे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी काढले. या दोन्ही प्रकरणांची चौकशी करणार्या अधिकार्यांची भुमिकेत हलगर्जीपणाची आहे. त्यामुळे सुशांतसिह आत्महत्या प्रकरणाचा तपास विशिष्ट टप्प्यावर येईपर्यत पोलीस आयुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, केंद्र सरकारने सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे दिला आहे. आपण एका माध्यमाला मुलाखतीत व्यक्त होताना असे म्हणाला होतात की, सीबीआय काय इंटरपोलने जरी चौकशी केली तरी आमची काही हरकत नाही. त्यामुळे राज्य सरकार सीबीआय चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणणार नाही, असा मला विश्वास आहे. त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यास मदतच होईल. या प्रकरणातील पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जात आहेत, अशा प्रकारची भावना जनमानसात निर्माण झाली आहे.
हेही वाचा - माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी घेतली जम्मू काश्मीरच्या उपराज्यपाल पदाची शपथ
पुढे भातखळकर म्हणाले की, राज्य सरकार सुशांतसिंह प्रकरणात कुठलीही लपवाछपवी करत नाही, आम्ही मान्य करतो पण पोलीस हलगर्जीपणा करत आहेत. त्यामुळे दोन्ही पोलीस अधिकार्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, किमान तपास विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
-
मा. मु. @OfficeofUT,
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
50 दिवस उलटले परंतु SSR आत्महत्याप्रकरणी FIR नाही, दिशाच्या आत्महत्येबाबत पोलीस जनतेकडून माहिती मागतायत. पुरावे नष्ट केले जातायत. या हलगर्जीपणाला जबाबदार पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवा,CBI तपासात आडकाठी येणार नाही याची खबरदारी घ्या. pic.twitter.com/0z4NF8rS96
">मा. मु. @OfficeofUT,
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 7, 2020
50 दिवस उलटले परंतु SSR आत्महत्याप्रकरणी FIR नाही, दिशाच्या आत्महत्येबाबत पोलीस जनतेकडून माहिती मागतायत. पुरावे नष्ट केले जातायत. या हलगर्जीपणाला जबाबदार पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवा,CBI तपासात आडकाठी येणार नाही याची खबरदारी घ्या. pic.twitter.com/0z4NF8rS96मा. मु. @OfficeofUT,
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 7, 2020
50 दिवस उलटले परंतु SSR आत्महत्याप्रकरणी FIR नाही, दिशाच्या आत्महत्येबाबत पोलीस जनतेकडून माहिती मागतायत. पुरावे नष्ट केले जातायत. या हलगर्जीपणाला जबाबदार पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवा,CBI तपासात आडकाठी येणार नाही याची खबरदारी घ्या. pic.twitter.com/0z4NF8rS96
तसेच, भातखळकर यांनी पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आपण योग्य ते निर्णय घेतले नाहीत, तर हे सर्व पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी असल्यामुळे मी केंद्रीय गृहमंत्र्याकडे या संदर्भात दाद मागेन, असाही इशारा भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.